सिव्हिल लाइन्स - वृक्षरथाला हिरवी झेंडी दाखविताना श्री. भगवान, शेजारी  एन. पी. खवारे, ए. के. मिश्रा, प्रवीण श्रीवास्तव, मल्लिकार्जुन, सुभाष डोंगरे.
सिव्हिल लाइन्स - वृक्षरथाला हिरवी झेंडी दाखविताना श्री. भगवान, शेजारी एन. पी. खवारे, ए. के. मिश्रा, प्रवीण श्रीवास्तव, मल्लिकार्जुन, सुभाष डोंगरे. 
विदर्भ

आता घरपोच मिळतील रोपटी - मुख्य वनसंरक्षक भगवान

सकाळवृत्तसेवा

नागपूर - वनविभागाद्वारे २५ जूनपासून ‘रोपे आपल्या दारी’ योजना राबविण्यात येणार आहे. यामुळे विविध संस्था, नागरिकांना सहज रोपे उपलब्ध होतील. वृक्षलागवडीच्या कार्यक्रमात नागरिकांनी हिरिरीने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्री. भगवान यांनी आज केले.  

नागपूर वनविभागाद्वारे तयार केलेल्या प्रचार प्रसिद्धी वृक्षरथाला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्यालयात हिरवी झेंडी दाखविल्यानंतर ते बोलत होते. 

यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व्यवस्थापन) एन. पी. खवारे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव, डॉ. दिलीप सिंह, अनिल काकोडकर, शैलेश टेंभुर्णीकर, आर. एस. यादव, जी. साईप्रकाश, जी. मल्लिकार्जुन, सहायक प्रसिद्धी व माहिती अधिकारी (वने) सुभाष डोंगरे, सहायक वनसंरक्षक विनायक उमाळे उपस्थित होते. 

भगवान म्हणाले, चार कोटी वृक्ष लागवडीपैकी वनविभाग २ कोटी २५ लाख वृक्षांची लागवड करणार आहे. या चित्ररथामुळे समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांपर्यंत रोपटी कशी लावावी, ती कशी जगवावी, याबाबत माहिती देण्यात येईल. वृक्षरथ नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया वनविभागातील सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये व जनतेला सहभागी होण्याकरिता या रथांच्या माध्यमातून प्रचार करणार आहे. 

वृक्ष लागवडीची प्राथमिक तयारी पूर्ण झालेली आहे. त्या कार्याची जागृती जनमानसात व्हावी या दृष्टीने नागपूर विभागाने त्यांच्याकडील संरक्षण वाहनांना वृक्षरथाचे स्वरूप देऊन, त्यांचा वापर जनजागृतीकरिता करण्याचा निर्धार केला. त्या रथावर जनजागृतीच्या उद्देशाने सुविचार, म्हणी, शुभसंदेश, छायाचित्र, ऑडिओ, व्हिडिओ स्वरूपात पर्यावरण संदेश लिहिण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या हत्येबाबत इस्रायलने आधीच दिली होती सूचना, नंतर महत्त्वाचे दस्तावेज गायब; एक्स्पर्टचा दावा

CCF Tea For Thyroid : Thyroid वर मात करायची असेल तर CCF चा हेल्दी चहा प्या, नक्की फरक पडेल

Fake Deepfake's : खऱ्या किंवा एडिटेड व्हिडीओजना लावलं जातंय 'डीपफेक' चं लेबल

Lok Sabha Poll 2024 : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ? माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Jalgaon News : अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

SCROLL FOR NEXT