50 percent of women have brittle bones control Osteopenia
50 percent of women have brittle bones control Osteopenia sakal
नागपूर

नागपूर : ५० टक्के महिलांची हाडे ठिसूळ होण्यास सुरूवात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून विमाधारक महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून शंभरावर महिलांची अस्थिघनता तपासण्यात आली असून पन्नास टक्के महिलांमध्ये हाडे ठिसुळ होण्यास सुरूवात होत असल्याचे दिसून आले. राज्य कामगार विमा सोसायटीच्या कामगार रुग्णालयात (ता.१०) १०० महिलांनी लाभ घेतला. विमा रुग्णालयातील महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा डॉ . अल्का जोगेवार यांच्या पुढाकारातून ‘कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळवणूकीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

वैशाली श्रीराम केळकर यांनी कार्यशाळेत माहिती दिली.महिला दिनाच्या पर्वावर मोरारजी टेक्सटाइल कंपनीतील ४० वर्षावरील विमेदार महिलांची आरोग्य तपासणी केली. वैद्यकीय अधीक्षीका डॉ. मीना देशमुख यांनी नियोजन केले. श्रमश्रीचे डॉ. शुभम इंगळे (भिषक) यांनी तर ‘सुनेत्र’ योजनेअंतर्गत डॉ . सोनाली कांबळे ( नेत्र रोग तज्ञ ) नेत्र तपासणी केली. नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन कांबळे होते. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अंजली भांडारकर, डॉ. प्रियंका सोनटक्के यांनी आरोग्य सुविधांची माहिती दिली . प्रशासकिय अधिकारी विजय गोडे आणि मोरारजी टेक्सटाइल कंपनीच्या प्रशासन अधिकारी रंजना ताकसांडे उपस्थित होते. डॉ . भावना चौधरी, डॉ . तारिक खानानी, वैशाली मकासरे, गणेश चावरिया, समता धारगावे यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव निलीमा केरकट्टा यांच्या संकल्पनेतून ‘श्रमश्री’ व ‘सुनेत्र’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. नागपुरातही राज्य कामगार रुग्णालयातर्फे विविध कंपन्यांमध्ये आरोग्य शिबिरातून विमेदारांची आरोग्य तपासणी होत आहे. हा स्तुत्य उपक्रम असून यातून महिलांसह पुरुषांनाही आरोग्याबाबत जागरुकता येईल.

-डॉ. मीना देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा रुग्णालय, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT