police custody
police custody sakal
नागपूर

प्रेमसंबंधात तरुणीचे लैंगिक शोषण; गर्भपात करून प्रियकराचा लग्नास नकार

मंगेश गोमासे

लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराने तरुणीचे लैंगिक शोषण करीत गर्भधारणा झाल्याने तिचा गर्भपात केला.

नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराने तरुणीचे लैंगिक शोषण करीत गर्भधारणा झाल्याने तिचा गर्भपात केला. मात्र, त्यानंतर लग्नास नकार देत विश्‍वासघात केला. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी २३ वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी तरुणावर गुन्हा नोंदविला आहे.

दीपेश प्रल्हाद पाठोडे (२७) रा. चिमूर, चंद्रपूर असे आरोपी तरुणाचे नाव आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये पीडितेची दीपेशशी ओळख झाली. मैत्रीनंतर दोघात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याने पीडितेला भेटण्यासाठी मासोळी बाजार परिसरातील हॉटेल आदर्शमध्ये बोलावले. तिच्याशीच लग्न करण्याची थाप मारून हॉटेलमध्ये पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून तो सतत तिचे लैंगिक शोषण करीत होता. दरम्यान पीडिता गर्भवती झाली.

तिने दीपेशला माहिती देऊन लवकर लग्न करण्यास सांगितले. दीपेशने लग्नापूर्वी गर्भवती असल्याचे समोर आले तर बदनामी होईल असे सांगून तिला गर्भपात करण्यासाठी तयार केले. त्याने गर्भपातानंतर लग्न करण्याचे वचन दिले होते. दोघांनीही एका डॉक्टरशी संपर्क करून गर्भपात करून घेतला. त्यानंतर दीपेशचे वागणे बदलले. त्याने पीडितेशी दुरावा केला. तो तिला सतत टाळू लागला.

काही दिवसांपूर्वी त्याने तिला लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. पीडितेने पोलिसात जाण्याचे बजावले असता दीपेशने दोघांच्या संबंधाची माहिती पीडितेचे मित्र आणि नातेवाईकांना देऊन बदनाम करण्याची धमकी दिली. पीडितेने गणेशपेठ पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून दीपेशला अटक केली. न्यायालयातून त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT