court hammer
court hammer 
नागपूर

मुंबई बॉम्बस्फोटातील या आरोपींना हवाय पॅरोल, याचिका प्रलंबित!

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मुंबई येथे 1998 साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी असगर कादर शेख आणि मोहम्मद याकूब नगुल यांनी तातडीची अभिवचन रजा (पॅरोल) मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये अर्ज दाखल केला. 23 जानेवारी ते 27 फेब्रुवारी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील या गुन्हेगारांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दोघेही नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. मागील महिन्यात त्यांनी दाखल केलेली याचिका प्रलंबित आहे.

याचिकेनुसार, मुंबईतील लोकलमध्ये कांजूरमार्ग, विरार, गोरेगाव, मालाड, सांताक्रुझ आणि कांदिवली रेल्वेस्थानकाजवळ साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात त्यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी जावेद मुलाम हसन, अफदाब सईद, असगर कादर शेख, कादीर मोहम्मद शेख, खालिद अन्सारी, शाब्र बशीर जव्हाण, जाफर शेख, मो. याकूब नगूल, मो. चौहान, अशफाक शेख, फारूख युसुफ शेख आणि अफताब शेख यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान, असगर कादर शेख आणि मोहम्मद याकुब नगूल यांनी पॅरोल मिळावा यासाठी सुरुवातीला कारागृह प्रशासनाकडे अर्ज केला होता.

मात्र, त्यांचा अर्ज बॉम्ब स्फोटातील आरोपी असल्याचे कारण देत नाकारण्यात आला. 15 आरोपींची तातडीची अभिवचन रजा मंजूर करण्यात आली. इतकेच नव्हे तर याच घटनेतील सह आरोपी जाफर हक शेख याला औरंगाबाद कारागृहातून पॅरोलवर सोडण्यात आले, असेही न्यायालयाला याचिकाकर्त्यांतर्फे युक्तिवाद करताना ऍड. मीर नगमान अली यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने प्रशासनाला नोटीस बजावून उत्तर दाखल करायचे आदेश दिले. या प्रकरणी न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SCROLL FOR NEXT