affidavit filed assembly elections 2014 two crimes was concealed Devendra Fadanvis nagpur politics
affidavit filed assembly elections 2014 two crimes was concealed Devendra Fadanvis nagpur politics esakal
नागपूर

Devendra Fadnavis : फडणवीसांना चढावी लागणार काेर्टाची पायरी; काय आहे प्रकरण ?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : निवडणूक शपथपत्रामध्ये गुन्ह्याची माहिती लपविल्या प्रकरणात आरोपी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालपपुढे उपस्थित राहावे लागू शकते. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात दोन गुन्ह्याची माहिती लपवली, असा आरोप ईडी प्रकरणातील आरोपी ऍड. सतीश उके यांनी केला आहे.

या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार त्यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे केली आहे. या तक्रारीवरील सुनावणी दरम्यान शुक्रवारी उके यांच्या बाजूने उक्तीवादाची तसेच साक्षी पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपीला न्यायालयात बायनासाठी उपस्थित राहावे लागते.

त्यानुसार, फडणवीस यांना १५ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीस उपस्थित राहावे लागू शकते. ते कामात व्यस्त असल्यास त्यांचे वकील बाजू मांडू शकतात, असेही सांगितल्या जाते. ऍड. उदय डबले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे बाजू मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT