nagpur sakal
नागपूर

Nagpur : नागपूर विद्यापीठाचा आयसीएआयसोबत सामंजस्य करार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) सोबत सामंजस्य करार केला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विविध आस्थापना, उद्योगांना असलेली कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांना कौशल्यपूरक अभ्यासक्रमाचे शिक्षण मिळावे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) सोबत सामंजस्य करार केला. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी व आयसीएआयच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष विशाल दोशी यांनी सामंजस्य कराराचे हस्तांतरण केले.

वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांना देखील कौशल्याचे धडे या एमओयूमुळे देणे शक्य होणार आहे. विद्यापीठातील कौशल्य विकासाची पोकळी भरून काढण्याचे कार्य हा करार करणार असल्याचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी म्हणाले.

आयसीएआयच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष विशाल दोशी यांनी विद्यापीठासोबत सामंजस्य करार होत असल्याने आनंद व्यक्त केला. यावेळी मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, आंतर विद्यासाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, आयसीएआयच्या अभ्यास मंडळाचे (विद्वत) अध्यक्ष विशाल दोशी, अध्यक्ष संजय अग्रवाल, डॉ. एन. एन. सेनगुप्ता, उपाध्यक्ष गुल्हाने, दिनेश राठी, स्वरूपा उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT