Brush expresses the canvas of life 
नागपूर

लॉकडाऊनच्या काळात शोधली संधी, आता मिळताहेत ऑनलाईन ऑर्डर, वाचा ही यशोगाथा...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना संकटामुळे चैतन्यच हरवलेल्या निरसकाळी नागपूरकर पंकज कावळे या हरहुन्नरी कलावंताने हाती कुंचला धरला. डोक्‍यातील कल्पनांना रंग दिला अन्‌ जीवनाचा कॅनव्हास बोलका झाला. साकारलेल्या कलाकृती सोशल मीडियावर टाकल्या. नागपूरकर रसिकांनीही त्यांच्या कलाकृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकृतींची ऑनलाईन खरेदी केली. 

ड्रॉइंग टिचर असणाऱ्या पंकज कावळे यांनी लॉकडाऊनच्या काळात संधी शोधली. घरी रिकामे बसून राहण्यापेक्षा त्यांनी रंगरेषांची साधना सुरू ठेवली. पेपरवर्क, कॅन्व्हास पेंटिंग, ऑईल पेंटिंग, ग्राफिक्‍सचे स्केच रेखाटत जीवनाला सकारत्मकतेचा रंग दिला. एक एक करीत अडीचशे ते तीनशे कलाकृती तयार झाल्या. अगदी सहज म्हणून त्यांनी कलाकृती फेसबुकसह अन्य समाज माध्यमांवर अपलोड केल्या.

अल्पावधीतच पेंटिंग्जना मागणी सुरू झाली. अनेकांनी ते खरेदी करण्याची इच्छाही व्यक्त केली. फारसे आढेवेढे न घेत मागणीनुसार कलाकृती उपलब्ध करून दिला. एका पेंटिंगला तब्बल 40 हजारांची किंमत मिळाली. लॉकडाऊनमध्येच त्यांनी दीड ते दोन लाखांच्या पेंटिंगची "ऑनलाईन' विक्री केली. पेंटिंगच्या मागणीसाठी त्यांचा फोन सतत खणखणत आहे. 

वडील लीलाधर आर्ट टिचर होते. यांच्याकडूनच पंकजला चित्रकलेचे बाळकडू मिळाले. 1993 मध्ये इयत्ता पाचवीत असतानाच चित्रकलेचे पहिले बक्षीस मिळाले. त्यानंतर एकामागून पुरस्कार मिळत गेले. सध्या ते "एमएफए'चे शिक्षण घेत आहेत. आयुष्यभर ब्रश सोसायचा नाही हा त्यांचा निश्‍चय आहे. चित्रकलेसोबतच पंकजला कवीता आणि लेखनाचीही आवड आहे. नाटकात कामाचाही अनुभव आहे. सध्या चित्रपट लिहायला घेतला आहे. तोही लवकरच चंदेरी पडद्यावर आणण्याचा त्यांचा मानस आहे. 

रसिकांचा प्रतिसाद प्रेरणादायी 
लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडणे शक्‍य नव्हते. या वेळेचा उपयोग मनातील कल्पना कॅन्व्हॉसवर उतरविण्याचा प्रयत्न केला. रसिकांचा प्रतिसादही प्रेरणादायी आहे. आता चित्रकलेला आणखी जास्त वेळ वेळ देणार आहे. विद्यार्थ्यांना चित्रकलेचे धडे देणेही सुरूच राहील. 
पंकज कावळे, युवा चित्रकार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारतीय खेळाडूंना पाकिस्तानविरुद्ध जबरदस्तीने खेळावं लागलं, BCCI...; दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा

Akola News : बंजारा व लभाण समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देवू नका; अकोल्यात बिरसा क्रांती दलतर्फे जिल्हा कचेरीवर भव्य मोर्चा

Latest Marathi News Updates : "हा तकलादू जीआर सुप्रीम कोर्टात टिकणार नाही"- सुजात आंबेडकर

Kej Heavy Rain : केज तालुक्यात पावसाचा हाहाकार! नदी-नाल्यांच्या पाण्याने केले उग्र स्वरूप धारण, केकाणवाडी पाझर तलाव फुटला

Supreme Court warn Election Commission : बिहार 'SIR'वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला इशारा अन् म्हटलं...

SCROLL FOR NEXT