cricket  sakal
नागपूर

cricket : क्रिकेटकडे वाढलाय मुलींचा कल

भरमसाठ मानधन व महिला आयपीएलमुळे शहरातील क्लबमध्ये गर्दी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कधीकाळी महिला क्रिकेटला ‘बोअरिंग क्रिकेट'' म्हणून हिणवले जात असे. मात्र आता काळ बदलला आहे. महिला क्रिकेटपटूंना पुरुषांच्या बरोबरीने मिळणारे भरमसाठ मानधन, महिलांची सुरू झालेली

आयपीएल आणि ज्युनिअर वर्ल्डकपमध्ये भारताने मिळविलेल्या ऐतिहासिक विजेतेपदानंतर नागपूरकर मुलींचाही क्रिकेटकडे कल वाढला आहे. शहरातील अनेक क्लबमध्ये क्रिकेट शिकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुली येऊ लागल्याने भविष्यात पुरुषांप्रमाणेच महिला क्रिकेटलाही सोन्याचे दिवस येणार असल्याचे बोलले जाते.

यासंदर्भात माहिती देताना नागपूर क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक माधव बाकरे म्हणाले, आधी आमच्याकडे येणाऱ्या मुलींचे प्रमाण खूपच नगण्य होते. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये ही संख्या झपाट्याने वाढली. आजघडीला आमच्या क्लबमध्ये जवळपास ६० मुली नियमित प्रॅक्टिस करतात. यामागचे कारण विचारले असता ते म्हणाले,

बीसीसीआयने महिला क्रिकेटचे नियंत्रण आपल्या हाती घेतल्यानंतर महिलांना पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणे भरपूर मानधन दिले जाते. शिवाय महिलांची आयपीएलही सुरू होणार आहे. तसेच भारतीय मुलींच्या संघाने नुकताच १९ वर्षांखालील वर्ल्डकपदेखील जिंकला. या सर्व कारणांमुळे अचानक मुलींचा ओढा क्रिकेटकडे वाढला.

ते म्हणाले, केवळ नागपूर क्रिकेट अकादमीतच नव्हे, शहरातील रुबी, रेशीमबाग, आंबेडकर, सिटी जिमखानासह इतरही छोट्या-मोठ्या क्लबमध्ये पोरींचे प्रमाण वाढले आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, गोंदिया, बुलडाणा व अन्य जिल्ह्यांमध्येही मुलींची क्लबमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे, टेनिस व ॲथलेटिक्ससारखे खेळ सोडून मुली क्रिकेटला जवळ करीत आहेत. येत्या उन्हाळी शिबिरांमध्ये क्रिकेट इच्छुक मुलींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता बाकरे यांनी वर्तविली. एकूणच चित्र बघता नागपूर व विदर्भात महिला क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल असल्याचे त्यांनी सांगितले.

पालक जागरूक

अलीकडच्या काळात मुलांप्रती पालकही जागरूक झाले आहेत. आपला मुलगा किंवा मुलगी एखादा खेळ खेळावा, असे बहुतांश पालकांना वाटते. त्यामुळे अभ्यासासोबतच अवांतर ‘ॲक्टिव्हिटीज’वरही भर दिला जात आहे. त्यामुळे अर्थातच सर्वाधिक पसंती स्पोर्ट्सला आणि त्यातही क्रिकेटला दिली जाते. कारण क्रिकेटमध्ये पैसा, प्रसिद्धी व ग्लॅमरसोबतच उज्ज्वल करिअरदेखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commerce Graduates Protest : शासकीय भरती प्रक्रियेत कॉमर्स पदवीधरांवर अन्याय, विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

टोलचे १०० रुपये वाचवायला शॉर्टकट घेतला, पण इंजिनिअरनं गमावला जीव; १५ दिवसांपूर्वी घेतलेली नवी कार

Latest Marathi News Live Update : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक मतदान पेट्या ने-आण करण्यासाठी पीएमपीएम एलच्या १ हजार ५६ बसेस धावणार

बिग बॉस सीजन 3 विजेत्या विशाल निकमने शेअर केले खऱ्या सौंदर्यासोबत फोटो ! 'या' अभिनेत्रीला करतोय डेट

Solapur Crime: बीड जिल्ह्यातील डॉक्टरास गर्भलिंगनिदान प्रकरणी अटक; बार्शीतील प्रकरण, तीनही संशयितांना पोलिस कोठडी!

SCROLL FOR NEXT