crime in india new crime story call for ransom police arrest criminals in four hours nagpur
crime in india new crime story call for ransom police arrest criminals in four hours nagpur  esakal
नागपूर

खंडणीसाठी कॉल केला अन् अपहरणकर्ते अडकले! चार तासात जेरबंद

मंगेश गोमासे

नागपूर : जीवनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जेवढा सुलभ आणि पारदर्शकतेने केल्या जातो तेवढेच त्याचे परिणामही स्पष्ट दिसून येणारे असतात. यामधून गुन्हेगाराचीही सुटका नाही. मालकाने नोकरीवरून काढल्याचा राग मनात धरून त्याच्या चार वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर खंडणीसाठी फोन केला आणि गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडले. ही थरारक घटना गुरूवारी(२३) रात्रीच्या सुमारास हिंगणा परिसरात घडली. पोलिसांनी चिमुकलीची सुखरूप सुटका करीत दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश सोनोने (रा. गणेशपूर) आणि संकेत अनिल ठाकरे (रा. टेंभरी) अशी या दोन आरोपी युवकांची नावे आहेत.आकाश हा पीडित मुलीच्या कुटुंबाचा ओळखीचा होता. तो तक्रारदार मुलीच्या वडिलांकडे काम करायचा. नंतर त्यांना नोकरीवरून काढले होते.

मात्र, आकाश नोकरीच्या बहाण्याने तक्रारदाराच्या संपर्कात राहिला. आकाश वारंवार तक्रारदाराच्या घरी जात असे. त्यामुळे पीडित मुलगीही त्याला ओळखत होती. त्यातून गुरुवारी सायंकाळी आकाशने मुलीच्या घरी गेला. तिथे त्याने मुलीला चॉकलेट घेऊन देतो असे सांगून तिला नेले. मात्र, रात्री उशिरापर्यंत मुलगी आढळून न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान रात्री आठच्या सुमारास आकाशने मुलीच्या वडिलांना फोन केला. याशिवाय मुलीला जिवंत पाहायचे असल्यास ७ लाख रुपयांची खंडणी मागितली.हा फोन ऐकून थक्क झालेल्या त्याच्या वडिलांनी एमआयडीसी बोरी पोलिसांना फोन केला. त्या आधारावर पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली. उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले आणि आरोपीचे लोकेशनही तपासले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री उशीरा दोघांनाही अटक केली.

खंडणीचा कॉल केला अन् अडकला

आकाशने चार वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्यावर तिला सोडण्यासाठी रात्रीआ ८ वाजताच्या सुमारास मुलीच्या वडिलांना कॉल केला. यावेळी त्याने सात लाखांची खंडणी मागितली. मात्र, याच कॉलवरुन सायबर सेलच्या पोलिसांनी त्याचे लोकशन तपासून चार तासात अटक केली.

पोलिसांचा सत्कार

पोलीस कॉन्स्टेबल इक्बाल शेख, प्रफुल्ल राठोड आणि दीप पांडे यांनी ४ वर्षांच्या मुलीला अटक करण्यात आणि वाचवण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यासाठी शेख, राठोड, पांडे यांचाही यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तपास पथकाला २५ हजार रुपयांचे बक्षीसही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT