bsp rpi
bsp rpi sakal media
नागपूर

बहुजन समाज पार्टीला धक्का देणार; आता रिपब्लिकन ऐक्य शक्य नाही

नीलेश डोये

नागपूर : उत्तर प्रदेशात कधीकाळी हत्तीवर निवडून आलेले सर्व लोकं हे रिपब्लिकन पक्षाचे होते. एका अर्थाने रिपब्लिकनांच्या जागा बहूजन पक्षाने बळकाल्या आहेत. आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची शक्ती तयार झाल्याने आपोआपच बहूजन पक्षाला धक्का बसणार आहे. महाराष्ट्रासह उत्तरेतच नव्हेतर देशात रिपब्लिकन पक्ष बळकट होत आहे, असा दावा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे केले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीला अभिवादन करण्यासाठी आठवले नागपुरात होते. शुक्रवारी त्यांनी रविभवनात पत्रकारांशी संवाद साधला, ते म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये आगामी फेब्रुवारी महिन्यात निवडणूका आहेत. स्वबळावर लढून आम्हाला यश येणार नाही. आम्ही केंद्र सरकारमध्ये घटक पक्ष असल्याने भाजपसोबतच लढू. किमान ८ ते १० जागा पक्षाला मिळतील.

भाजपच्या साथीने आम्ही उत्तर प्रदेशात यश मिळेल. १८ डिसेंबरला ब्राम्हण सम्मेलन असून विविध जातीधर्माचे लोकं रिपाईकडे आकर्षित होत आहे. यामुळे आता ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आता ऐक्याची भाषा वापरण्यापासून फारकत घेतली आहे. आरपीआयचे ऐक्य शक्य नसल्याने पक्ष वाढीवर भर देत असल्याचे ते म्हणाले.जम्मू आणि काश्‍मीरला आतंकवादी हल्ले करत आहेत. त्यामुळे तेथे सर्जिकल स्ट्राईक करण्याची आवश्‍यकता पडू शकते, असे अमित शहा म्हणाले. पण त्या स्ट्राईकचा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीशी काही संबंध नाही, असे आठवले यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भूपेश थुलकर, पुरण मेश्राम, राजन वाघमारे, बाळू घरडे, सतिश तांबे उपस्थित होते.

काटा काढून छापा

ईडी, सीबीआय आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून छापा टाकून काटा काढण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने करण्यात येतो. पण आम्ही छापा टाकून काटा काढत नाही, तर काटा काढून मग छापा टाकतो, असे रामदास आठवले म्‍हणाले.

तर प्रत्येक आंदोलनामुळे कायदे रद्द करावे लागतील

केंद्राने केलेले कृषी कायदे शेतकरी हिताचे आहेत. सरकार त्यात सुधारणा करण्यास तयार आहे. फक्त आंदोलनामुळे कायदे रद्द केले तर चुकीचा संदेश जाईल. प्रत्येक आंदोलनामुळे कायदे रद्द करावे लागतील. त्यामुळे सरकार ते कायदे रद्द करणार नाही. त्यात सुधारणा होऊ शकते, असे आठवले म्हणाले.

परदेशी शिष्यवृत्तीची गुण मर्यादा कमी करू

परदेशी शिष्यवृत्तीकरता गुणाची मर्यादा ५५ वरून ६० करण्यात आल्‍याने अनेक जण अपात्र ठरत आहे. ही मर्यादा कमी करण्यासोबत विद्यार्थी संख्याही वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेचा आज महानिकाल! NDA हॅट्रिक साधणार की INDIA सत्तेत येणार याची उत्कंठा शिगेला

India Lok Sabha Election Results Live : निकालाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान भाजपचे ऑफिस फुलांनी सजले

Lok Sabha Election Result 2024 : आठ हजार जणांचे भवितव्य आज ठरणार

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 4 जून 2024

Maharashtra Lok Sabha Election Results Live : राज्यात मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण; उद्या 8 वाजता मतमोजणीला होणार सुरुवात

SCROLL FOR NEXT