'पितृपक्ष' ही भोंदूगिरी; उद्धव ठाकरेंनी दिला प्रबोधनकारांचा दाखला

प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखसंग्रह ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySakal
Updated on

प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखसंग्रह ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. प्रबोधनातील प्रबोधनकार या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित असताना उद्धव ठाकरे यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरे आणि आजोबा प्रबोधनकार ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला.

उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना प्रबोधकार ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिल्या. आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींमधून आमची जडणघडण झाली असून, त्यामुळे शब्दांचं धन हे माझ्याही पेटाऱ्यात आहे, मात्र लोकशाहीत फक्त मत असून चालत नाही तर हिंमत सुद्धा लागते असं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं. १०० वर्षांपूर्वीच्या काळात असलेल्या वाईट रुढी परंपरा त्या लोकांनी कशा मोडीत काढल्या हे समजून घेण्यासाठी साहित्य महत्वाचं आहे.

Uddhav Thackeray
...तर आम्हाला चित्रपटात भूमिका द्या - गिरीश महाजन

संत तुकारामांच्या पोथ्या बुडवल्या होत्या, त्या जशा वर आल्या होत्या, तोच क्षण आज मी अनुभवत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांवर बोलताना त्यांनी ढोंग आणि अंधश्रद्धेला लाथडल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसंच हिंदूत्व हा एक विचार असला तरी धारा वेगवेगळ्या आहेत आणि आमचं हिंदूत्व हे शेंडी जाणव्याचं हिंदूत्व नाही असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com