santosh ambekar
santosh ambekar 
नागपूर

कुख्यात डॉन संतोष आंबेकर, गॅंगस्टर राजा गौसला झाली भयंकर बाधा...

सकाळ वृत्तसेवा

नागपूरः नागपूर मध्यवर्ती कारागृहात न्यायाधीन कैदी असलेला राज्यातील नावाजलेला कुख्यात डॉन संतोष आंबेकर आणि गॅंगस्टर राजा गौस या दोघांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. दोघांवरही मध्यवर्ती कारागृहातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंबेकर आणि राजा यांना कोरोना झाल्यामुळे गुन्हेगारी जगतात चर्चेला ऊत आला आहे.
कारागृहातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात डॉन संतोष आंबेकरची शहरात एकतर्फी दहशत आहे. डॉन आंबेकरच्या प्रत्येक पंटरकडे विदेशी पिस्तूल असल्याची माहिती आहे. डॉन आंबेकरने गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांची पाच कोटींनी फसवणूक केली. तसेच मुंबईच्या व्यापाऱ्याला भूखंड खरेदीत गंडविले होते. तसेच इतवारीतील एका सराफा व्यापाऱ्याचे घर हडपले होते.

एका 17 वर्षांच्या मुलीवर ब्यूटीपार्लरमध्ये बलात्कार केला होता, तर लकडगंजमधील एका डॉक्‍टर तरुणीवर सलग पाच वर्षे बलात्कार केल्याचा आरोप डॉन आंबेकरवर आहे. या सर्व गुन्ह्यांत गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन राजमाने यांनी डॉन आंबेकरला अटक केली आहे. सध्या आंबेकर मध्यवर्ती कारागृहात न्यायाधीन कैदी म्हणून दाखल होता. मध्यवर्ती कारागृहात कोरोनाने शिरकाव केला असून, आतापर्यंत 192 कैदी, कारागृह कर्मचारी आणि अधिकारी कोरोनाबाधित आहेत. यामध्ये नव्याने डॉन संतोष आंबेकर हा कोरोनाबाधित झाला आहे. तासाभरात दुसरा गॅंगस्टर राजा गौस याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

 कारागृहातील डॉक्‍टर्स कोरोनाबाधितांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवून आहेत. दोन्ही गॅंगस्टर्सला विशेष सेलमध्ये ठेवण्यात आले असून, त्यांना बाहेर निघण्यास मनाई करण्यात आली. त्यांना सेलमध्ये विलीगकरणात ठेवण्यात आले आहे. राजा गौस हा गेल्या 2013 पासून मध्यवर्ती कारागृहात आहे. त्याला उत्तर प्रदेशातील प्रतापगडमधून अटक करण्यात आली होती. त्याने रोशन समरित या युवकाचा खून केला होता. तसेच पोलिसांवरही गोळीबार करून पळ काढला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT