Plastic Waste Management Campaign at Pandharagota  sakal
नागपूर

Plastic Management Drive: ‘प्लास्टिकचा राक्षस’ केला बाटलीत बंद ! वृक्षसंवर्धन टिम पाढंरगोटाचा पर्यावरणपूरक उपक्रम

How Pandharagota Inspired a Village-Level Plastic Cleanup: पाढंरगोटा येथील वृक्षसंवर्धन टीमने ‘प्लास्टिकचा राक्षस बाटलीत’ बंद करून पर्यावरण जनजागृतीचा अभिनव उपक्रम राबवला.

सकाळ वृत्तसेवा

Tree Conservation Team’s Innovative Plastic Control Campaign: एकल वापर प्लास्टिक हे पर्यावरणास खूप घातक ठरत आहे. त्याचा पुनर्वापर करता येत नाही, तसेच पुनर्चक्रीकरण करणे दुरापास्त असते. मग ते गटारे-प्रवाह तुंबणे, प्राण्यांच्या पोटात जाऊन अडकून बसणे, समुद्रतळाशी जाऊन तेथील जैवविविधता धोक्यात आणणे हे दुष्परिणाम घडवून आणतात.

म्हणून त्यानिमित्ताने गोसेखुर्द प्रकल्पबाधिताच्या वृक्षसंवर्धन टिम पाढंरगोटाच्या पर्यावरण शिक्षण, संशोधन व संवर्धन विभागामार्फत परिसरात शालेय विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम राबविण्यात आला. त्याचे नाव होते,प्लास्टिकचा राक्षस... करा बाटलीत बंद’. एकल वापर प्लास्टिकचे संकलन हा उपक्रमाचा उद्देश होता. जवळपास १०० विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेऊन जवळपास २०० किलो प्लास्टिकचा राक्षस बाटलीत बंद केला आहे. यामध्ये चॉकलेट, प्लास्टिक पिशवी, स्ट्रॉ अशा बऱ्याच वस्तू आहेत.

प्लास्टिकमुळे माती, पाणी आणि समुद्री जीवसृष्टीचे मोठे नुकसान होते .त्यामुळे प्लास्टिक वापर कमी करणे आणि पर्यावरणपूरक पर्याय निवडणे ही काळाची गरज आहे. निसर्ग संपदेचे संवर्धन, नैसर्गिक स्तोत्रांचे जतन, हे संस्कार विद्यार्थ्यांत रुजवण्याचे काम अशा वेगवेगळ्या उपक्रमातून होणे गरजेचे आहे.

- आकाश टाले, सप्तखंजेरी वादक व प्रबोधनकार

पर्यावरण हा अतिशय संवेदनशील विषय असून आज भावी पिढीपुढे प्लास्टिक व इतर पर्यावरणीय समस्यांमुळे अस्तित्वाचे संकट उभे राहिले आहे. ‘पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा’ या विषयाच्या माध्यमातून तरुणांना सहभागी करून घेऊन या समस्या सोडविणे शक्य आहेत.

- अश्लेशा शहारे, पर्यावरण आणि जलसुरक्षा मैत्रिण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT