Fake profile on matrimonial site 
नागपूर

शादी डॉट कॉमवर दोघांचे प्रोफाईल मॅच झाले. मने जुळली, लग्नही झाले. मग उघड झाले हे सत्य...

अनिल कांबळे

नागपूर : पीडित युवती अपूर्णा जोशी (28, रा. निरी कॉलनी, बजाजनगर) ही केमिकल इंजिनिअर असून ती पुण्यातील एका नामांकित कंपनीत नोकरीवर होती. विवाहासाठी अपूर्णाने शादी डॉट कॉमवर प्रोफाईल टाकले होता.

तिच्या प्रोफाईलला मॅच झालेल्या स्वयम संजीव जोशी (रा. यवतमाळ) याने तिला फोन केला. फोनवरून बोलणे झाली आणि एकमेकांच्या भेटी-गाठी झाल्या. दोघेही 2 सप्टेबर 2018 पासून संपर्कात होते. त्यानंतर दोघांच्याही कुटुंबियांनी बोलणी करून लग्नाची तारीख ठरवली. आरोपी स्वयंम जोशी याने आपण मेलबोर्न विद्यापिठात प्राध्यापक असल्याचे सांगितले होते.

तीच माहिती त्याच्या शादी डॉट कॉमवरील प्रोफाईलमध्ये होती. उच्चशिक्षित युवकाशी विवाह होत असल्यामुळे अपूर्णा आनंदात होती. विवाहासाठी अपर्णाने पुण्यातील मोठ्या पगाराची नोकरी सोडली. मोठ्या धुमधडाक्‍यात त्यांचा विवाह झाला. अपूर्णा सासरी यवतमाळ येथे राहायला गेली. विवाह समारंभ आणि महागड्या वस्तू भेट देण्यासाठी जवळपास 25 लाख रुपये तिने स्वयम जोशी आणि त्याच्या कुटुंबियांवर खर्च केले.

यवतमाळमध्ये सासरी राहत असताना सासू अर्चना संजीव जोशी (वय 54) आणि नणंद सेजल संजीव जोशी (वय 25) यांनी अपूर्णाला टोमणे मारणे सुरू केले. हिऱ्याची अंगठी, कार आणि नेकलेस आणण्यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. एव्हाना स्वयमचेही पितळ उघडे पडले. त्याने बनावट प्रोफाईल आयडी बनवल्याचे अपूर्णाच्या लक्षात आले. पती, सासू आणि नणंद वारंवार पैशाची मागणी करीत मारहाण करीत असल्यामुळे कंटाळून ती माहेरी नागपुरात परतली. आईवडिलांना सासरच्या मंडळीकडून होणारा छळ सांगितला आणि पती, सासू आणि नणंदेविरूद्ध पोलिसांत तक्रार केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी स्वयम जोशी, अर्चना जोशी आणि सेजल जोशी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्न युनिव्हर्सिटीत नोकरीवर असल्याचे बनावट प्रोफाईल तयार करून युवकाने केमिकल इंजिनिअर असलेल्या नागपुरातील युवतीशी विवाह केला. विवाहानंतर गिफ्ट म्हणून कार, हिऱ्याची अंगठी अशा महागड्या वस्तूंची मागणी केली. यासाठी पती, सासू आणि नणंदेने मारहाण करीत घराबाहेर काढण्याची धमकी दिली. या प्रकाराला कंटाळलेल्या विवाहितेने अखेर बजाजनगर पोलिसांत तक्रार केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

(संपादन : प्रशांत राॅय)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Weather: विदर्भात परतीच्या पावसाची शक्यता; १७ आॅक्टोबरनंतर नागपूरसह काही जिल्ह्यांत यलो अलर्ट

Satara Drought Relief: दुष्काळग्रस्तांसाठी मोठा दिलासा! साताऱ्यात मागणी करताच मिळणार मोफत धान्य; स्थलांतरितांनाही लाभ

Maharashtra Weather Update : एकीकडे ऑक्टोबर हिटचा तडाखा, दुसरीकडे विजांसह पाऊस लावणार हजेरी; महाराष्ट्रातील हवामानाचा नवा अंदाज जारी

Navratri Day 5: स्कन्दमाता

Wildlife Tourism: वाघांच्या पलीकडे मध्य प्रदेशाची नवी झेप; चंबळमध्ये डॉल्फिन, गांधी सागरमध्ये गिधाड सफारीची योजना

SCROLL FOR NEXT