file photo
file photo 
नागपूर

व्वा रे जिल्हा परिषद... आर्थिक टंचाईत सल्लागारावर उधळण

नीलेश डोये

नागपूर : जिल्हा परिषदेकडून निविदा तयार करण्याचे काम सल्लागाराकडून करण्याचा निर्णय परस्पर घेण्यात आला. यासाठी सल्लागाराला लाखो रुपये मोजण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाने तयार करून सभेत पाठविल्याने सल्लागार नियुक्तीचे बिंग फुटले. आर्थिक टंचाई असताना सल्लागारावर उधळण करण्याचा प्रस्ताव तयार केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

आतापर्यंत निविदा तयार करणारे अधिकारी अचानक लायक नसल्याचे बांधकाम विभागाला आताच साक्षात्कार कसा झाला? असा सवाल उपस्थित होत आहे. या सल्लागाराची नियुक्ती बांधकाम विभागाकडून परस्पर करण्यात आली. या सल्लागाराची निवड कोणी व कोणत्या आधारे करण्यात आली, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा परिषदच्या मालकीचे सरपंच भवन आहे. येथे लॉन तयार करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे आता निवासी गाड्यांचेही नुतनीकरण करण्यात येत आहे. यावर लाखोंचा खर्च करण्यात येत आहे. येथील व्यवस्था खाजगी व्यक्तीकडे देण्याची जि.प.ची तयारी आहे. लॉन, हॉल, निवासी कक्ष, कॅन्टीन, सायकल स्टॅंड व इतर व्यवस्था खाजगी व्यक्तीकडे देण्यात येईल. या करता निविदा काढण्याचे निश्चित झाले.

सल्लागाराकडून निविदा तयार करण्यात येणार आहे. याकरता त्याला लाखो रुपये मोजण्याची तयारी जि.प. ने दर्शविली. सल्लागार म्हणून मे प्राईस वॉटर हाऊस कूपर्स प्रा.लि. यांची नियुक्ती करण्याचा निर्णयही झाला. याला सेस फंडातून रक्कम देण्याचे ठरले. विशेष म्हणजे याची नेमणूक करण्याचा विषय बांधकाम समितीच्या बैठकीत आला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे याची निवड कोणत्या आधारावर झाली, असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

विचारणा करण्यात येईल
सल्लागार अतिशय महागडा आहे. सर्वसाधारण सभेत हा विषय आला होता, तो नामंजूर करण्यात आला. याची निवड कोणी केली, याची विचारणा करण्यात येईल.
मनोहर कुंभारे, उपाध्यक्ष व सभापती, बांधकाम, जि.प.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT