Food Oil
Food Oil Sakal
नागपूर

नागपूर : दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेल महागणार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - सततच्या पावसामुळे तेलबियांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने येणाऱ्या सणासुदीच्या काळात खाद्य तेलाची मागणी वाढणार आहे. तसेच तेलाचे सध्याचे असणारे दरही आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या फारशी मागणी नसल्याने चढलेल्या स्थितीत तेलाचे भाव स्थिरावलेले आहेत. मागील चार महिन्यात खाद्यतेलांचे दर व उपलब्धता यांचा मेळ पूर्णपणे बिघडला आहे. भारतात दरवर्षी एकूण गरजेच्या ६० टक्के खाद्यतेल आयात होते. हे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान, खाद्य तेलाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने त्यावरील आयात शुल्क कमी केला. मात्र, दरात हवी तशी घसरण झालेली नसल्याचे चित्र आहे.

पावसामुळे तेलबियांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे आगामी दसरा, दिवाळी सणाच्या मुहूर्तावर खाद्यतेलाचे दर १२५ ते ३०० रुपयांनी वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दिवाळीनंतर नवीन उत्पादन बाजारात येते. त्यानंतर खाद्य तेलाच्या दरात घसरण होण्याची शक्यता असते. यंदा सोयाबीन, सूर्यफूल, भुईमुगाचे पावसामुळे शेतातील या पिकांचे २५ टक्के नुकसान झालेले आहे. सोयाबीन सोंगल्यानंतर शेतात पडलेले आहे. त्याला आता कोंब फुटू लागलेले आहे. तसेच गुजरात आणि मराठवाड्यातही पावसाने शेतातील भुईमुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याचे उत्पादन घटणार असल्याने यंदा खाद्य तेलाच्या दरात घसरण होण्याची शक्यता धूसर असल्याचे नागपूर किरकोळ व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे खरिपातील पिकांना मोठा फटका बसला. यात सोयाबीन, सूर्यफूल पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच परदेशातून होणारी आयातही मंदावली आहे.

राजस्थानमध्ये सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे मग, मटकीचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा या कडधान्याचे भाव कडाडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT