file photo
file photo 
नागपूर

आयुक्त तुकाराम मुंढेंना उच्च न्यायालयाने फटकारले...काय आहे कारण वाचा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना योध्यांची रॅपिड अँटिबॉडी टेस्ट करण्याची गरज नाही, अशी भूमिका घेणारे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फटकारले. घटनेतील कलम 21 नुसार हा त्यांचा मूलभूत अधिकार असल्याचे म्हणत संपूर्ण विदर्भातील कोरोना योद्‌ध्यांची चाचणी करण्याचे दिले आदेश. याबाबत सिटिझन फोरम फॉर इक्वॅलिटीचे अध्यक्ष मधुकर कुकडे यांनी जनहित याचिका दाखल केली.  

22 मे रोजी सुनावणी दरम्यान सतरंजीपुरा, मोनिमपुरा परिसरामध्ये कर्तव्य पार पडणाऱ्या 1 हजार 51 कोरोना योध्यांची रॅपिड अँटिबॉडी टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांनी न्यायालयाला शपथपत्र दाखल करीत दिली. एकीकडे प्रशासनाने स्वतःचा जीव धोक्‍यात घालून काम करणाऱ्या कोरोना योध्यांची चाचणी करण्याचा निर्णय घेतला असताना महापालिका आयुक्तांनी मात्र चाचणी घेण्याची गरज नसल्याची भूमिका घेतली. याबाबत महापालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांनी आयुक्तांद्वारे शपथपत्र दाखल केले होते. अनेक कोरोना योद्धे पीपीई किटचा वापर करून आपले कर्तव्य बजावीत आहे.

त्याशिवाय हॅन्डग्लोज, मास्क, ग्लोज असे संरक्षणात्मक साधनांचासुद्धा ते वापर करीत आहेत आणि हे वापरणे त्यांना सक्तीचेदेखील करण्यात आले आहे. प्रत्येक योध्यांची चाचणी केल्यास त्याचा राज्य शासनाच्या तिरोजीवर भर येईल आणि महापालिकेलादेखील अतिरिक्त मनुष्यबळ त्याकरिता उपलब्ध करून घ्यावे लागेल. त्यामुळे, प्रत्येक योध्याची चाचणी करण्याची गरज नाही, असे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे. 

महापालिकेने घेतलेली ही भूमिका हास्यास्पद असून घटनेतील कलम 21 नुसार मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारीसुद्धा आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व कोरोना योध्यांची रॅपिड अँटिबॉडी टेस्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला दिले. त्यानुसार, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, फार्मासिस्ट, पोलीस कर्मचारी यांच्या तपासण्या होणार आहेत. शिवाय, येत्या 7 दिवसांमध्ये आयसीएमआरआयने याबाबत योजना आखावी, असेही आदेशामध्ये नमूद केले. याचिकाकर्त्यातर्फे ऍड. तुषार मांडलेकर यांनी, राज्य सरकारतर्फे ऍड. सुमंत देवपुजारी यांनी, महापालिकेतर्फे ऍड. सुधीर पुराणिक यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणी न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : खराब सुरूवातीनंतर लखनौनं डाव सावरला; राहुलची आक्रमक फलंदाजी

DC vs MI, IPL 2024: टीम डेविडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT