Vaastu Shastra
Vaastu Shastra SAKAL
नागपूर

Vaastu Shastra : ‘त्या’ घरात नांदते सुख, शांती अन् समृद्धी

नरेंद्र चोरे : सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भारतीय संस्कृतीत घर आणि वास्तूशास्त्राला विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्यास सुख, शांती, समृद्धी, यश, चैतन्य, आर्थिक संपन्नता लाभते. त्यामुळे घर बांधकाम करताना नियोजन आणि वास्तुशास्त्रातील मूलभूत नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असल्याचे वास्तुशास्त्र जाणकारांचे म्हणणे आहे. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य व वास्तुतज्ज्ञ डॉ. अनिल वैद्य म्हणाले, वास्तूशास्त्र मोठा व सामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. वास्तू आयुष्यातील प्रत्येक बाबीशी निगडीत असल्याने भूखंड खरेदीपूर्वी तसेच घर बांधकामाआधी काही बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रानुसार व्यवस्थित घर बांधल्यास त्या घरात सुख, शांती व समृद्धी नांदते. वास्तूत दोष असल्यास आर्थिक अडचणी व आजारांसह अनेक अडचणी येतात. हा अंधश्रद्धेचा भाग नाही, पण वस्तुस्थिती आहे.

भूखंड असावा चौकोनी व आयताकार

वास्तुशास्त्रात भूखंडाला (प्लॉट) फार महत्त्व आहे. भूखंड चौकोनी, आयताकार व वर्गाकार असावा. तो शक्यतो त्रिकोणी किंवा तिरपा नसू नये. दक्षिण दिशेलाही नसावा. ज्या भूखंडाच्या पूर्व व उत्तर दिशांना रस्ता आहे व पश्चिम व दक्षिण दिशांना मार्ग असलेला भूखंडही चांगला असतो.

घर बांधताना घ्यायची काळजी

घर बांधतानाही काही गोष्टी लक्षात घ्याव्या. प्लॉटच्या चारही बाजूंनी येणारे रस्ते, प्लॉटची लांबी-रुंदी व प्लॉटवरील झाडे लक्षात घेऊन बांधकाम करावे. घर बांधताना सहसा उत्तर, पूर्व व ईशान्य दिशेला अधिक जागा सोडावी. छताचा उतार उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावा. नळ किंवा बोअरवेल ईशान्य किंवा नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यातच असायला हवी. खिडक्या पूर्व व उत्तर दिशेला अधिक असाव्या. शक्यतो दक्षिण दिशेला खिडक्या ठेवू नये.

प्रवेशद्वार मोठे असावे

प्रवेशद्वार घरातील इतर दारांपेक्षा मोठे असावे. कारण मुख्य दारातून घरात विशिष्ट प्रकारची सकारात्मक ऊर्जा अर्थात लक्ष्मी येते. लक्ष्मी ही राजमार्गाने व सन्मानाने आली पाहिजे. दारासमोर भिंत असू नये. त्यामुळे अनेक अडचणी येतात. शिवाय मुख्य दारासमोर चप्पल रॅक नको. रॅक दूर असावी. प्रवेशद्वारासमोर स्तंभही (खांब) नको. त्यामुळे घरातील महिला नेहमी आजारी पडतात.

किचन आग्नेय कोपऱ्यात असावे

स्वयंपाक खोली ही आग्नेय कोपऱ्यात असावी. स्वयंपाक करताना गृहिणीचे तोंड दक्षिणेकडे नसावे. किचन हवेशीर असावे. पसारा कमी असावा. किचनमध्ये जेवण करताना तोंड नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. तसेच फ्रीज, मिक्सर व ओव्हन किचनच्या आग्नेय भागात असावे. वास्तुशास्त्रानुसार, मॉड्युलर किचनही चांगले मानले जाते.

  • घराला नेहमी लाईट कलर असावा

  • मुख्य दारासमोर मोकळी जागा (अंगण) असावे

  • धान्याचे कोठार दक्षिण-पश्चिमेला असावे

  • देवघर व पिण्याचे पाणी ईशान्य दिशेला असावे

  • बाल्कनी सहसा उत्तर, पूर्व दिशेला असावी

  • अंघोळ करताना तोंड उत्तरेला असावे

  • टॉयलेट दक्षिण किंवा पश्चिमेस असावे

  • घरात रडके किंवा चिंताग्रस्त फोटो लावू नयेत

  • शिवाजी किंवा खेळाडूंचे फोटो लावावे, अभिनेत्यांचे नको

  • हसरा फॅमिली फोटो असल्यास उत्तम

  • मुलांनी पूर्व दिशेकडे पाहूनच अभ्यास करावा

  • ज्वेलरी सहसा वायव्य दिशेला ठेवावी

  • वास्तुशास्त्रात लिफ्टला अयोग्य मानले जाते

शयनकक्ष असावा नैऋत्य दिशेला

वास्तुशास्त्रात किचनप्रमाणेच बेडरूमचेही तितकेच महत्त्व आहे. घरमालकाचा अर्थात कर्त्या व्यक्तीचा शयनकक्ष (मास्टर बेडरूम) सहसा नैऋत्य दिशेला अपेक्षित आहे. झोपताना डोकं दक्षिणेला व पाय उत्तरेला असावे. दक्षिणेला मोठ्या मुलाची व पश्चिमेला छोट्या मुलाची बेडरूम असावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT