The influence of Corona now includes trade, small business 
नागपूर

करोना'च्या प्रभावात आता व्यापार, लघुउद्योगही

ok

नागपूर : "करोना' व्हायरसने चीनमध्ये थैमान घातले आहे. त्याचा फटका भारतीयांना बसण्याची शक्‍यता आहे. चीनमध्ये करोना व्हायरसमुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील औद्योगिक उत्पादनावर प्रचंड परिणाम झाला आहे. नजीकच्या काळात चीनमधून भारतात येणाऱ्या मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या आयातीत मोठी घसरण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघाने (कॅट) केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पाठविलेल्या पत्रात उद्योजक आणि व्यापाऱ्यांची बैठक बोलविण्याची मागणी केली.


भारतातील स्मार्टफोनची बाजारपेठ मोठी आहे. यात "मेड इन चायना' फोनचा बोलबाला होता. मात्र, मागील महिनाभरापासून चीनने करोना व्हायरसच्या भीतीने इतर देशांशी असलेला व्यापार थांबविला आहे. करोना व्हायरस पसरू नये म्हणून निर्यातीवर अंशत: निर्बंध घालण्यात आले आहेत. याशिवाय चीनमधून खेळणी, फर्निचर, बिल्डर हार्डवेअर, फुटवेअर, कपडे, फर्निशिंग फॅब्रिक, एफएमजीसी उत्पादने, भेटवस्तूंचे साहित्य, घड्याळी, इलेक्‍ट्रॉनिक साहित्य, विजेची उपकरणे, स्वयंपाकाचे साहित्य, ऑटो स्पेअर पार्टस, मशीनरी साहित्य, कागद, स्टेशनरी साहित्य, फर्टिलायझर्स, सर्जिकल साहित्य, लोखंडाची मोठी उत्पादने, कमी किमतीचे एअर कंडिशनर, इंजिनिअरिंग साहित्य, रसायन, बांधकाम साहित्याला लागणारे साहित्य, प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिकचे साहित्य, कॉम्प्युटर व कॉम्प्युटर साहित्य, अगरबत्ती तयार करणारे बांबू आदी वस्तू येतात.

चीनमधील शेकडो कारखाने बंद

बीजिंग, शांघाय, शेंझेन, ग्वान्गझू शहरांमधील उद्योगांना "करोना'ची झळ बसली आहे. "करोना'चे सर्वाधिक बळी गेलेल्या हुबेई प्रांतातील झेझिंग आणि जिंन्नसगू भागातील शेकडो कारखाने अनेक दिवसांपासून बंद आहेत. यामुळे स्मार्टफोन कंपन्यांना फटका बसण्याची शक्‍यता आहे. अनेक कंपन्यांनी भारतात इलेक्‍ट्रॉनिक्‍स साहित्याची निर्मिती सुरू केली असली तरी या कंपन्या चीनमधील आयातीवर अवलंबून आहेत. मोबाईल आणि कॉम्प्युटरचे सुटे भाग आजही चीनमधून मोठ्या प्रमाणात आयात केले जातात. त्यामुळे भारतातील स्मार्टफोन उत्पादनावर परिणाम होणार आहे.

देशांतर्गत उत्पादनक्षमता वाढावी

सरकारने चीनमधून येत असलेले साहित्य आणि इतर देशांतून आलेल्या वस्तूंमुळे भारतीय नागरिकांच्या आरोग्याला काही धोका आहे का, हे तपासले पाहिजे. तसे असल्यास त्यावर उपचारात्मक पाऊल उचलणे गरजेचे आहे. ई-कॉमर्ससह इतरही देशांतील भारतात येणाऱ्या वस्तूंची तपासणी करावी. त्यानंतरच त्या वस्तू देशात येऊ देण्यास परवानगी द्यावी, असाही उल्लेख पत्रात केला आहे. यानिमित्ताने भारतीय लहान व मध्यम उद्योगांनी आपली उत्पादन क्षमता वाढवावी, असेही कॅटचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT