गृहमंत्री वळसे पाटील
गृहमंत्री वळसे पाटील  Sakal
नागपूर

भोंग्यांच्या राजकारणावर खाकीची करडी नजर : गृहमंत्री

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - भोंग्यांच्या राजकारणाआड राज्यात अशांतता निर्माण केली जात असेल तर कडक कारवाई केली जाईल. तशा सूचना पोलिस महासंचालकांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक शहरातील पोलिस आयुक्त यावर करडी नजर ठेऊन असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. नागपूरचे संपर्कमंत्री या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीसाठी ते मंगळवारी नागपूरमध्ये आले होते. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी काही घटकांकडून अशांतता निर्माण होईल, असे प्रयत्न होत असल्याचे सांगितले. देशात आणि राज्यातही सर्व पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहे. गृहविभाग पूर्ण तयारीत आहे. कुठल्याही वक्तव्यामुळे आणि बोलण्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर कारवाई केली जाणारच आहे, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

मी माझ्या पद्धतीने काम करतो

आपल्या देशात वेगवेगळ्या कारणांवरून जातीय भावना भडकावण्याचा प्रयत्न होत आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. मी माझ्या पद्धतीने कायदा व नियमानुसार काम करतो. इतर कोणी काय बोलतात हे महत्त्वाचे नाही, असे सांगून गृहमंत्री वळसे पाटील यांनी शिवसेनेच्या नेत्यांनाही सौम्य शब्दात प्रत्युत्तर दिले. मध्यंतरी शिवसेनेच्यावतीने वळसे पाटील यांना कडक भूमिका घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT