नागपूर

मुलीच्या सासुरवाडीवरून पतरणाऱ्या आई, भावाचा अपघाती मृत्यू

अनिल कांबळे

नागपूर : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने मायलेक जागीच ठार झाले. हा भीषण अपघात नवीन कामठी पोलिस ठाण्यांतर्गत लिहिगाव पोलिस चौकीसमोर महामार्गावर घडला. मनीषा गोपाल खुरपडी (वय ४२) व अनिकेत गोपाल खुरपडी (वय २२, दोन्ही रा. गादा, ता. कामठी) अशी मृतांची नावे आहेत. (Mother-and-brother-killed-in-car-crash)

मनीषा यांच्या मुलीची सासुरवाडी उमरेड तालुक्यातील वडद गावी आहे. ते मुलीच्या घरी भेट देण्यासाठी मुलासह एमएच-४०, बीएम-३९१४ क्रमांकाच्या मोपेडने गेले होते. मुलीच्या घरून परत येत असताना लिहिगाव परिसरात महामार्गावर एमएच-४९, बीके-१७११ क्रमांकाच्या कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकी चकनाचूर झाली व दुचाकीवरील दोघेही मायलेक गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. अपघातानंतर कारचालक पळून गेला. माहिती मिळताच नवीन कामठी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कामठीतील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार, एक गंभीर

भरधाव दोन दुचाकीची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना भिवापूर-जवळी मार्गावरील नक्षी नदीच्या पुलाजवळ घडली. दिलीप गोपाळराव देशमुख (वय ५८, रा. तातोली) असे मृताचे तर सुरेश चौधरी रा. झिलबोडी असे जखमी दुचाकीचालकाचे नाव आहे. गंभीर मार लागल्याने त्याला नागपूरला हलविण्यात आले असून, प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. बुधवारी दुपारी मृत दिलीप देशमुख हे दुचाकी क्रमांक एम. एच. ४0/एम. ६३८७ ने भिवापूरवरून तातोलीला जात होते. नक्षी नदीवरील पूल ओलांडताच भरधाव येत असलेल्या दुचाकी क्रमांक एम.एच. ३१/डी.जे. 00८0 ला त्यांच्या दुचाकीची धडक लागली.

(Mother-and-brother-killed-in-car-crash)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

Cannes 2024: हात फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये दिसला ऐश्वर्याचा जलवा; लेक आराध्याचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक

Neelam Gorhe : जातीय तेढीमुळे आत्महत्या वाढतात;नीलम गोऱ्हे,कृषी क्षेत्रातील चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्या

SCROLL FOR NEXT