murder
murder murder
नागपूर

फ्रीजमध्ये ठेवला होता दीपाचा मृतदेह; एका लाखासाठी पती-पत्नीने केला खून

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : स्कूलबसमध्ये बस कंडक्टर असलेल्या दिपा जुगल दास (३५, रा. समर्थनगर) या महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. शनिवारी दीपाच्या मैत्रिणीने पतीसोबत खून केल्यावर मृतदेह प्लॅस्टिकमध्ये फ्रीजमध्ये ठेवून रात्री खरड्यात भरून फेकल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी दीपाची मैत्रीण सुवर्णा सोनी आणि सामी सोनी यांना अटक करण्यात आली आहे.

कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उप्पलवाडी येथे रविवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती. मारेकऱ्यांनी खून करून मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून उप्पलवाडीच्या जंगलात फेकल्याचे दिसून आले. जैन इंटरनॅशनल शाळेच्या स्कूल बसवर दिपा मदतनीस (कंडक्टर) म्हणून कामाला होती. ती बचतगट चालवायची. त्यातूनच तिने सुवर्णाला एक लाख रुपये कर्ज दिले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ती आणि तिचा पती पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते.

शनिवारी शाळा संपल्यावर दुपारी ती सुवर्णाच्या घरी गेल्यावर तिला नवा फ्रीज आणि काही सामान दिसले. त्यामुळे ती संतापली. तिने याबाबत तिला विचारणा केली. याशिवाय कर्जाचे पैसे देता येत नसल्याचे सुनावले. यावेळी दोघींचेही चांगलेच भांडण झाले. त्यामुळे पती सामी सोनी (२५) याने तिचा गळा ओढला. याशिवाय सुवर्णाने तिचे पाय धरून ठेवले. दीपाचा मृत्यू होतात मृतदेह पॉलिथिनमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवला. रात्री सामीने ई-रिक्षामध्ये तिचा मृतदेह फ्रीजच्या बॉक्समध्ये भरून उप्पलवाडीमध्ये फेकून दिला.

दिपा द्यायची पाईल्सची औषध

दोन वर्षांपूर्वी दिपा आणि सुवर्णा या पक्क्या मैत्रिणी झाल्या. सुवर्णाला पाईल्सचा त्रास असल्याने तिला दिपा औषध द्यायची. शनिवारी शाळेत जाताना तिने मुलीला येताना ती सुवर्णाकडे औषध देण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे जेव्हा दिपा घरी नाही परतली तेव्हा तिचा पती जुगलदास याने पोलिसांकडे मिसिंगची तक्रार दिली. यावेळी पोलिसांनी सुवर्णानाही विचारपूस केली. दरम्यान तिचा घरी नवा फ्रीज आणि वॉशिंगमशीन असल्याचे आढळून आले. यावेळी दीपाचा मृतदेहही फ्रीजच्या नव्या पॉलिथिन आणि खर्ड्यात आढळून आल्याने पोलिसांना शंका आली. त्यामुळे तिला ताब्यात घेऊन विचारणा केल्यावर तिने खुनाची कबुली दिली.

२०१९ मध्ये केले लग्न

सुवर्णाचे यापूर्वीच तिच्या आई-वडिलांनी लग्न लावून दिले होते. मात्र, नवरा ठीक नसल्याने तिने तिथून पळ काढून नाशिकला स्थायिक झाली. तिथे पंचवीस वर्षाचा सामी सोनी तिला भेटला. २०१९ मध्ये ते लग्न करून नागपुरात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atala Masjid: भिंतीवर त्रिशूळ, फुले? जौनपूरमधील अटाला मंदीर की मशीद? हिंदुंनी गाठलं कोर्ट, काय आहे संपूर्ण प्रकरण

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT