Nagpur administration service
Nagpur administration service 
नागपूर

Nagpur : सुस्त प्रशासनाला सेवा पंधरवड्याचा डोस

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यातील सत्तांतरण, मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना विलंब झाल्याने सुस्तावलेल्या प्रशासनाला सेवा पंधरवडाच्या माध्यमातून खडबडून जागे केले जात आहे. विविध शिबिरांचे आयोजन करून राज्य सरकारने प्रशासनाला एकप्रकारे कामाला लावले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सत्तास्थापन केली. राज्यात शिंदे सरकार येऊन आज अडीच महिन्यांचा काळ लोटला. परंतु पूर्ण मंत्रिमंडळही गठित झाले नाही. फक्त १८ मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली असून यातील काहींनी पदभार स्वीकारला नाही.

दरम्यानच्या काळात सरकारकडून एक एप्रिल २०२१ पासूनच्या कामांना स्थगिती देण्यात आली. त्यामुळे आताच्या घडीला प्रशासन कोणतेही नवीन विकास कामे हाती घेत नाहीत. पालकमंत्र्याच्या निवडीनंतर जिल्हा नियोजन समिती तसेच इतर विकास कामे करण्यात येणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

संपूर्ण विकासकामे ठप्प असल्याने प्रशासनाकडेही फारसे काम नाही. ही बाब सरकारच्या लक्षात आल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येते. त्यामुळे प्रशासनाला विविध योजना राबविणे, शिबिरे व सेवा पंढरवड्याच्या माध्यमातून कामाला लावण्यात आल्याचे सांगण्यात येते. सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्ज निकाली काढण्यासाठी सेवा पंधरवडा सारखे कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

विविध शिबिरांचेही आयोजन होत आहे. याचा काही प्रमाणात फायदा नागरिकांना होत असल्याने ओरड कमी असल्याची दिसते. महानगर पालिकेकडून महिलांसाठी महिलांसाठी अभियान सुरू करणार आहे. विविध उपक्रम व कार्यक्रमांच्या माध्यमातून शासन प्रशासनाला गुंतवून ठेवण्यात येत असल्याचे चित्र आहे.

शिंदे सरकार मविआसारखेच

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात काहीच कामे झाली नाहीत. मुख्यमंत्री घरबाहेर पडले नाही असा आरोप भाजप नेते करीत होते. मात्र शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतरही फाईली हलत नाही. कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे आघाडी आणि शिंदे सरकार यांच्यात काहीच फरक नाही असा रोष नागरिक व्यक्त करीत आहेत. हे सरकार स्वागत समारंभ व इव्हेंटमध्येच व्यस्त असल्याचे बोलले जात आहे. गेल्या अडीच महिन्यापासून हजारो कोटींची कामे प्रलंबित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT