Nagpur Crime News
Nagpur Crime News sakal
नागपूर

Nagpur Crime: ‘गॅस कटर’ने एटीएम फोडण्याच्या प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

Nagpur Crime News: जरिपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जिंजल मॉल रोडवरील कॅनरा बॅकेची एटीएम मशीन चोरट्याने गॅस कटरद्वारे फोडण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात एटीएमला आग लागल्याने चोरट्यांनी गॅस कटर ठेऊन पसार झाले.

ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी (ता.२९) पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली. सकाळी ही घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरिपटका परिसरात असलेल्या मेकोसाबाग कब्रस्तान जवळ असलेल्या जिंजल मॉल रोड येथे कॅनरा बॅंकेचे एटीएम आहे. गुरुवारी पहाटे तीन वाजता दुचाकीवरुन तीन युवक तेथे आले.

त्यांच्या जवळ गॅस कटर, सिलींडर आणि एटीएम कापण्यासाठी लागणारे विविध उपकरणे होती. त्यांनी एटीएमच्या सीसीटीव्हीवर कपडा टाकला. त्यानंतर गॅस कटर आणि इतर उपकरणांच्या साह्याने मशीन कापत होते. खुप खटाटोप केल्यावर आरोपी एटीएमच्या लॉकरपर्यंत पोहोचले. दरम्यान गॅस कटरमुळे एटीएमला आग लागली. (Marathi Tajya Batmya)

ही आग पसरेल या भितीने चोरटे तिथून पसार झाले. सकाळच्या सुमारास नागरिकांना एटीएममध्ये काहीतरी जळाल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. सहायक पोलिस आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांचासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.

त्यांनी एटीएमची पाहणी केली. तिथे गॅस कटर आढळून आले. यावेळी बॅंकेच्या मदतीने तेथील सीसीटीव्ही कॅमेरांची तपासणी केली असता, त्या ठिकाणी तीन जणांनी शिरुन एटीएम गॅस कटरने फोडण्याच्या प्रयत्न केल्याची बाब समोर आली.

सकाळी केली पाहणी, पहाटे प्रयत्न

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, यात आरोपी ११ वाजता परिसरात फिरत असल्याचे दिसून आले. यावेळी आरोपीने बराच वेळ एटीएम आणि परिसराची पाहणी केल्याचे दिसून आले. त्यानंतर तिघेही पहाटे ३ वाजता एटीएम फोडण्यासाठी दुचाकीवर ट्रिपल सीट आले. यातील एक आरोपी सरदार आहे. दुचाकीचा नंबर न मिळाल्यामुळे त्यांची ओळख पटली नाही.

सुरक्षारक्षक नव्हता

जरिपटका परिसरात असलेल्या एटीएममध्ये सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे मध्यरात्री सुनसान रस्त्याच्या फायदा घेऊन कॅनरा बॅंकेच्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची बाब दिसून आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT