crime news
crime news esakal
नागपूर

नागपूर : तरुणीवर दोघांचा अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : औषधाच्या दुकानात काम करणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून एकाने तिच्यावर अत्याचार केला. नंतर आरोपीच्या मित्राने प्रकरण निवळण्याच्या बहाण्याने घरी बोलावून अत्याचार केला. याला कंटाळून अखेर पीडितेने पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर बलात्काराचा गुन्हा नोंदवून एकाला अटक केली आहे. कमर अली कारंजावाला (४५) रा. हुडको अपार्टमेंट असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तर आसिफ शेख रा. यशोधरा नगर असे दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. ही घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगी ही नागपूरमध्ये एका औषधाच्या दुकानात काम करते. एप्रिल महिन्याच्या १५ तारखेला काटोल ते नागपूर असा प्रवास करताना तिची कमर अली सोबत ओळख झाली. दोघांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिले. त्यानंतर दोघांचा नेहमी संपर्क होत गेला. पीडित तरुणीला आणखी उच्चपदाच्या नोकरीची गरज होती. ही बाब तिने कमर अलीला बोलून दाखविली. या संधीचा फायदा त्याने घेतला.

नोकरी लाऊन देण्याचे आमिष दाखविले. नंतर बोलण्यात थापा मारून जाळ्यात ओढले. तरुणी जाळ्यात अडकल्याची खात्री पडताच त्याने घरी कुणी नसताना नोकरीसाठी लागणारे कागदपत्र घरी घेऊन येण्यास सांगितले. ती कमर अलीच्या घरी आली. त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नंतर ही बाब कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर जवळपास २६ जूनपर्यंत तो मिळेल तेव्हा पीडितेवर अत्याचार करू लागला. त्याने यादरम्यान तिला मारहाणही केली. हा सगळा अत्याचार ती भीतीपोटी सहन करीत होती.

मित्रानेही केला अत्याचार

पीडित मुलीचे लैंगिक शोषण करीत असल्याची माहिती कमरने आपला मित्र आसिफला सांगितली. आसिफनेही कमरच्या पावलावर पाऊल टाकत पीडितेला कमरचे प्रकरण पूर्णपणे निवळण्याची ग्वाही दिली. दरम्यान २६ जून रोजी आसिफच्या घरी कुणी नव्हते. त्याने मुलीला प्रकरण निवळण्यासाठी घरी बोलाविले. ती घरी येताच त्यानेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दोघांकडून वारंवार होत असलेल्या अत्याचाराने त्रासलेल्या पीडित तरुणीने शेवटी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी दोघांवरही बलात्काराचा गुन्हा नोंदवून कमर अलीला अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT