Obscene Acts in Car eSakal
नागपूर

Nagpur: प्रेमीयुगलाचा प्रताप! धावत्या कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवर अश्लील चाळे; Video व्हायरल होताच पोलिसांचा दणका

Nagpur Obscene Acts in Car With girlfriend Viral Video: यासंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी यासंदर्भात कारवाई केली आहे.

कार्तिक पुजारी

Nagpur Viral Video: सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक प्रेमीयुगल चालत्या कारमध्ये अश्लील चाळे करत असल्याचं आढळून आलं होतं. १५ जुलै रोजी रात्री साडेसात वाजता लॉ कॉलेज चौक आणि लक्ष्मी भवन चौक, धर्मापेठ याठिकाणी ही घटना घडली होती. यासंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी यासंदर्भात कारवाई केली आहे. नागपूर टूडे यांनी यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

MH 31 FA 6506 नंबर असलेल्या कारमध्ये चालक एका तरुणीसोबत ड्रायव्हिंट सीटवर बसून अश्लील चाळे करत असल्याचं दिसून आलं होतं. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारचे कृत पाहायला मिळाल्याने अनेकांनी याबाबत संताप व्यक्त केला होता. तरुणाचे नाव सुरज राजकुमार सोनी ( वय २८) असं असल्याचं कळंतय. तो सीए (Chartered Accountant) आहे, तर २७ वर्षीय तरुणी इंजिनिअर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरजने आपल्या वडिलांकडून ह्युंदाई i-10 घेतली होती. त्याने रात्री सात वाजता तिच्या प्रेयसीला पीक केलं. दोघांनी एकत्र प्रवास सुरू केला. गिरीपेठ, धर्मपेठ भागामध्ये त्यांनी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांना हे दिसलं. काहींनी हा प्रसंग कॅमेऱ्यामध्ये कैद केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता.

सिताबर्डी पोलिसांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांना MH-31/FA-6506 क्रमांकाची कार आढळून आली. पोलिसांनी सूरज, तिची प्रेयसी आणि त्यांच्या पालकांना चौकशीसाठी प्राचारण केले. पोलिसांनी अनेक कलमा अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. जोडप्याला जामिनावर सोडून देण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra News: अवघ्या दोनशे रुपयांत होणार जमिनींचे पोटहिस्से, मोजणी फीमध्ये सवलत; राज्य भूमी अभिलेख विभागाचा निर्णय

Walking Benefits: फक्त 1 किमी चालण्याची सवय लावा! शरीरात होणारे बदल पाहून तुम्हीही चकित व्हाल

अभिनयातून व्यवसायाकडे वळला अभिजित केळकर; ‘प्रत्येक घासात अस्सल चव’ देण्याचा निर्धार

वरिष्ठांच्या छळाला कंटाळून अधिकाऱ्याचं टोकाचं पाऊल, निवृत्तीला उरलेले फक्त दहा दिवस; काय घडलं?

Latest Marathi News Live Update : नागपूर-तळेगाव मार्गावर कारंजा शहराजवळ भीषण अपघात

SCROLL FOR NEXT