वरिष्ठांच्या छळाला कंटाळून अधिकाऱ्याचं टोकाचं पाऊल, निवृत्तीला उरलेले फक्त दहा दिवस; काय घडलं?

Mallikarjun Suicide Case निवृत्तीला अवघे १० दिवस उरले असताना एका अधिकाऱ्यानं वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. आत्महत्येआधी केलेल्या व्हिडीओत गंभीर आरोप करण्यात आलेत.
Senior Harassment Alleged in Officer Death Case Just Ten Days Before Retirement

Senior Harassment Alleged in Officer Death Case Just Ten Days Before Retirement

Esakal

Updated on

बंगळूर, ता. २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कथित कंटाळून समाज कल्याण विभागातील एका अधिकाऱ्याने कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पावगड तालुक्यात घडली आहे. पावगड तालुका समाज कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक मल्लिकार्जुन (वय ६०) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. तीन वर्षांपासून ते या पदावर कार्यरत होते. विशेष म्हणजे, त्यांची सेवा येत्या ३१ मार्च रोजी संपणार होती. निवृत्तीपूर्वी अवघ्या काही दिवसांतच घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com