Nagpur Father and son to life imprisonment in murder case
Nagpur Father and son to life imprisonment in murder case sakal
नागपूर

नागपूर : पिता-पुत्रांना जन्मठेपेची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या इसमाचा चाकूने भोसकून खून करणाऱ्या पिता-पुत्रांसह तीन आरोपींना जिल्हा न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. रामू ऊर्फ चुन्नी मुन्ना महतो (२६), चेतन मुन्ना महतो (२४) अशी आरोपी मुलांची व मुन्ना मोहन महतो (५०, सर्व रा. सुदर्शन मंदिराजवळ, ट्रस्ट लेआऊट, पांढराबोडी) असे शिक्षा झालेल्या आरोपी वडिलाचे नाव आहे.

खुनाची घटना ४ ऑक्टोबर २०२० रोजी घडली. आरोपींनी रात्री दहा वाजताच्या सुमारास दिनेश संताराम नहरकर (३३, रा. पांढराबोडी) यांच्या घरासमोर येत त्यांच्या पुतण्याला शिवीगाळ केली. तसेच मारहाणही केली. भांडण वाढू नये म्हणून कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांना घरात नेले. मात्र, अंगात शैतान संचारल्याप्रमाणे रामू,चेतन हे दोघे भाऊ आणि वडील मुन्ना यांनी नहरकर यांच्या घराचा दरवाजा तोडून जबरदस्तीने आत घुसले आणि भांडण करू लागले.

दिनेश संताराम नहरकर यांनी तिघांविरोधात अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला. न्यायालयाने साक्ष-पुरावा लक्षात घेता तीनही आरोपींना दोषी ठरविले. न्यायाधीश एम. एस. आजमी यांनी निर्णय देताना तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शासनातर्फे आनंद ठाकरे यांनी बाजू मांडली. तर, आरोपीतर्फे ॲड. अजय भंडारे यांनी कामकाज पाहिले.

दोघांनी पकडून ठेवत चाकूने वार

दिनेश यांचे मोठे बंधू अशोक संताराम नहरकर (४०) यांनी आरोपींना थांबविण्याचा प्रयत्न केला असता मुन्ना आणि चेतन या बापलेकांनी अशोक यांना पकडून ठेवले. असहाय्य झालेल्या अशोक यांच्यावर राम ऊर्फ चुन्नी याने चाकूने हात, छाती आणि पोटावर सपासप वार केले. यात गंभीर जखमी झालेले अशोक यांचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT