Nagpur fule scarcity 60 percent petrol pump closed
Nagpur fule scarcity 60 percent petrol pump closed sakal
नागपूर

नागपूर : शहरातील ६० टक्के पंप ड्राय

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : इंधन कंपन्यांनी २०१७ पासून पंप डीलर्सचे कमिशन वाढविण्यात न आल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यासाठी त्याविरोधात आज शहरातील पंप चालकांनी कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलची खरेदी केली नाही. त्यामुळे शहरातील ६० टक्के पेट्रोल पंपावरील इंधन संपले होते. अनेक पंपावर ‘नो स्टॉक’चे बोर्ड लागले होते. बुधवारपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता आहे.

पेट्रोल व डिझेल चालक मालक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य सकाळीच बोरखेडी येथील बीपीसीएलच्या आणि पुलगाव येथील नायरा डेपोच्या प्रवेशद्वाराजवळ गोळा झाले होते. यामुळे आज एकही गाडी इंधन घेऊन या डेपोतून बाहेर पडली नाही. त्यामुळे अनेक पंपावरील इंधन संपले होते. डीलर्स उद्या इंधनाची मागणी करणार आहेत. त्यामुळे पंप सुरळीत सुरु होण्यासाठी एक दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. एचपीसीएल आणि इंडियन ऑईलचा डेपो पुलगाव येथे आहे. तेथून इंधन आणण्यासाठी बराच वेळ लागणार आहे.

दर वाढीनुसारच कपातही करा

सरकारने शनिवारी उत्पादन शुल्क कमी केल्याने त्याचा अधिक फटका पंप चालकांना बसला. यापूर्वीही दिवाळीच्या काळात सुटी लक्षात घेऊन दर कमी केले होते. तेव्हा आम्ही सरकारकडे इंधनाचे दर जसे वाढतात त्याच पद्धतीने कमी करावे अशी मागणी केली होती. मात्र, त्याला केराची टोपली दाखविल्याचे दर कपातीवरुन दिसून येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल

पेट्रोल व डिझेलचे डीलर्स उधारीत तेलाची मागणी करतात. त्यामुळे त्यांना पुरवठा करण्यात येत नसल्याची चुकीची माहिती इंधन कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आर. विमला यांना सोमवारी झालेल्या बैठकीत दिली. परंतु, डिलर्सला ही सवय कंपन्यांच्या याच अधिकाऱ्यांनी लावली आहे. डीलर्सचे ३२ कोटी रुपये इंधन कंपन्यांकडे असताना अशी दिशाभूल करणारी माहिती प्रशासनाला दिली जात आहे हे अयोग्य असल्याचे पंपचालकांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT