nagpur inflation citizen face financial problems to survive
nagpur inflation citizen face financial problems to survive sakal
नागपूर

नागपूर : महागाईने आणले रडकुंडीला!

राजेश रामपूरकर

नागपूर : आज सर्वसामान्य आणि हातावर पोट असणारे गरीब कुटुंब महागाईमुळे रडकुंडीला आले आहेत. महागाईमुळे जनता हतबल झाली आहे. एकीकडे उन्हाचे चटके बसत असताना दुसरीकडे नागरिक महागाईच्या वरवंट्याखाली भरडले जात आहेत. कोरोना महामारीमुळे पदरमोड करून वाचविलेला पैसा खर्च झाला तर दुसरीकडे हातच्या नोकऱ्या गेल्याने आणि कामच मिळेनासे झाल्याने गरीब जनता हतबल झाली. त्यातच महागाई कमी करण्याचा दावा करणाऱ्या मायबाप सरकारनेही महागाईच्या मुद्यावर हात वर केल्याने वाढलेल्या महागाईने सामान्यांचे जगणेच नव्हे तर मरणंही कठीण झाले आहे. गेल्या सहा महिन्यात महागाईने उच्चांक गाठला आहे.

कमाई आणि खर्चाचा ताळमेळच बसेना!

वाढलेल्या महागाईमुळे महिनाअखेरपर्यंत उत्पन्न आणि खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी सामान्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा भागविताना बजेट बिघडले आहे. परिणामी, नागरिकांची बचत वस्तू खरेदीसाठी खर्च होऊ लागली आहे. परिणामी, अनेकांनी खरेदीपासून थोड्या फार प्रमाणात हात आखडता घेतला आहे. वस्तूंच्या विक्रीत घट झालेली आहे.

चूल पेटविण्याची वेळ

महागाईचा वणवा पेटला असताना रशिया-युक्रेन युद्धाने त्यात तेल ओतले गेले अन्‌ छोट्या व्यापाऱ्यांपासून पगारदारारांपर्यंत प्रत्येकाची होरपळ वाढली. पेट्रोल, डिझेल, गॅस महागल्यानंतर सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडेच मोडले आहे. उन्हाळ्यात मसाल्यासाठीच्या मिरचीच्या भावात यंदा विक्रमी वाढ झालेली आहे. १२० रुपये किलो मिळणारी मिरची यंदा २५० ते २६० रुपये किलो झालेली आहे. तांदूळ, गव्हासह बहुतांश सर्व अन्न पदार्थांच्या दरात वाढ झाली. त्यामुळे रोजचा उदरनिर्वाह करणेही अवघड झालेले आहे. पूर्वी महिन्याला दोन हजार रुपयांचे पेट्रोल लागत होते. तिथे आता ३००० ते ३५०० रुपये मोजावे लागत आहेत. सिलिंडरसाठी आता १०५४.५० रुपये मोजावे लागत आहेत. वाढलेल्या दरामुळे अनेकांनी लाकडावर चूल पेटविण्यास सुरवात केलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Yoga Tips : उत्तम पचनक्षमतेसाठी योगा फायदेशीर, जेवण झाल्यावर करा ‘या’ योगासनांचा सराव

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

SCROLL FOR NEXT