Nagpur medical sector 170 mothers death in Pregnancy in year
Nagpur medical sector 170 mothers death in Pregnancy in year sakal
नागपूर

नागपूर : वर्षभरात १७० मातांचा मृत्यू

केवल जीवनतारे

नागपूर : दूर्धर आजांरावर मात करणारे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रात विकसित झाले आहे. या तंत्रज्ञानामुळेच मृत्यूदर कमी झाल्याचे दावे केले जात असले तरी निदान नागपूर शहरातील वैद्यकीय क्षेत्र याला अपवाद असल्याचे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण गेल्या वर्षभरात उपराजधानीत १७० मातामृत्यू झाले आहेत. एवढेच नव्हे तर गेल्या तीन महिन्यात १९ मातामृत्यूंची नोंद झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

आई होण्याइतकी आनंदाची गोष्ट महिलांच्या आयुष्यात नाही. पण मातृत्वाचा आनंद घेण्याआधीच नागपुरात विविध रुग्णालयांत उपचारासाठी आलेल्या १७० मातांना जगाचा निरोप घ्यावा लागला. हे विदारक चित्र एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या काळातील आहे. मातामृत्यूने उपराजधानीत दिडशेपेक्षा जास्त मातांचा मृत्यू झाल्यानंतरही वैद्यकीय विश्‍लेषणाच्या पलिकडे कोणतीही उपाययोजना केली जात नाही.

गरोदरपणाच्या काळातील पोषण आहार, आरोग्यसेवांचा अभाव, यामुळे प्रसूतीच्यावेळी अडचणी येतात. झोपडपट्ट्यांमध्ये घरीच प्रसूती होण्याचे प्रकार याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे साफ दुर्लक्ष आहे. त्याच अनेक झोपडपट्ट्यांमध्ये शंभरपैकी ५० महिलांना रक्तक्षय आढळून येतो. राज्यात २००३ मध्ये एक लाखामागे ३०१ मातामृत्यू दर होता. २०१२ मध्ये हेच प्रमाण १७० तर २०१८ मध्ये हे प्रमाण १२० वर आले आहे.

या वर्षी हे प्रमाण १०० वर आणण्याचे लक्ष्य आहे. मात्र, कोरोनामुळे याकडे दुर्लक्ष झाले. माता मृत्यूसाठी संसर्ग मोठे कारण ठरते. यात मृत्यूचे प्रमाण ११ टक्के आहे, उच्चरक्तदाबामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ५ टक्के, विविध गुंतागुंतीमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ८ टक्के आहे.

कोरोनाच्या लढाईत दुर्लक्ष

माता व बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागात नियुक्त समिती आहे. मात्र कोरोनाच्या लढाईत संपूर्ण आरोग्य यंत्रणा जुंपली असल्याने या समितीची बैठक आजपर्यंत होऊ शकलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाशी संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

माता मृत्यूची कारणे

रक्तस्राव - पूर्वीचा रक्तस्राव - जंतुसंसर्ग

इकॅलॅम्सिया - ऍनिमिया - अडलेली प्रसूती

महापालिकेकडून आरोग्याचे व्हीजन नाहीच..

राज्याचे आरोग्य खात्याकडून माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याचा करण्याचा कार्यक्रम आखला जातो. परंतु, उपराजधानीत नागपूर महापालिकेकडून हा कृती कार्यक्रम आखलाच जात नाही. महापालिकेच्या एकाही रुग्णालयात प्रसूत मातेला व्हेंटिलेटरची गरज भासल्यास उपलब्ध होत नाही. मेयो, मेडिकल डागा आदि शासकीय रुग्णालयांसह खासगीत मातामृत्यूची नोंद होते. गर्भधारणेपासून प्रसूतीनंतर सहा आठवड्यापर्यंत गरोदरपणाशी संबंधित कारणांमुळे महिलांचा मृत्यू झाल्यास माता मृत्यू म्हणून नोंद होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT