Nagpur Metro sakal
नागपूर

Nagpur Metro : परवानगी न घेता सुरू केलेले काम ‘जनहितार्थ’;महामेट्रोचे हास्यास्पद उत्तर

फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन चौकातील प्रस्तावित बोगद्याचे काम सुरू होत असल्याची माहिती अलीकडेच उच्च न्यायालयापुढे सादर करण्यात आली होती. त्यासाठी रस्ता सुद्धा बंद करण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन चौकातील प्रस्तावित बोगद्याचे काम सुरू होत असल्याची माहिती अलीकडेच उच्च न्यायालयापुढे सादर करण्यात आली होती. त्यासाठी रस्ता सुद्धा बंद करण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. आवश्यक त्या परवानग्या न घेता बांधकाम सुरू केल्याने न्यायालयाने त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हे काम जनहितार्थ सुरू असल्याचे मेट्रोतर्फे न्यायालयात सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावर कोणत्याही परवानग्या न घेता कार्यादेश काढता, तुमचे जनहित आम्हाला माहिती आहे, अशी नाराजी न्यायालयाने मौखिक स्वरूपात व्यक्त केली.

फ्रीडम पार्क पासूनचा बोगदा बांधण्यामागील कारण काय, अशी विचारणा करण्यासह माजी मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयदीप दास यांनी उच्च न्यायालयाला पत्र लिहिल्यानंतर उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. यावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ते मानस चौकापर्यंत सध्या डांबरी रस्ता कार्यान्वित असून या मार्गावर वाहतुकीत कोणताही गोंधळ निर्माण होत नाही.

प्रश्‍न केवळ फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन चौकाचा असून त्या ठिकाणी सिग्नलद्वारे वाहतूक सुरळीत केली जाते. प्रस्तावित असलेला मार्ग हा पश्‍चिम पूर्व दिशेला आहे. तर, वाहतुकीचा ओघ हा उत्तर-दक्षिण मार्गावर (आरबीआय चौक ते सीताबर्डी) जास्त आढळून येतो. हा बोगदा बांधण्याच्या कामाला सुरवात झाली असल्याचे समोर येताच उच्च न्यायालयाने महामेट्रो व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) फटकारले. परवानगी मिळेपर्यंत संबंधित बॅरिकेटिंग हटविले जाईल व मार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला जाईल, असे आश्वासन गेल्या वेळी महामेट्रोतर्फे देण्यात आले होते.

यावर आज झालेल्या सुनावणी दरम्यानही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच मेट्रो व वाहतूक उपायुक्तांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने यावरही नाराजी व्यक्त केली. झाडे कापण्याची तसेच अन्य परवानग्या नसताना कार्यादेश कसा निघाला? यावरूनही फटकारले. यावर मेट्रो व वाहतूक उपायुक्तांनी एका आठवड्यात उत्तर सादर करावे, असे आदेश न्यायालयाने यावेळी दिले. पुढील सुनावणी बुधवारी (ता. १९) निश्‍चित केली. न्यायालयीन मित्र म्हणून ॲड. कुलदीप महल्ले यांनी, महामेट्रोतर्फे एस. के. मिश्रा यांनी, तर महापालिकेतर्फे ॲड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.

मेट्रो स्थानकाखालील स्थळ धोकादायक

सीताबर्डी पोलिस ठाण्याकडून इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सकडे वळल्यास फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन खालील मार्ग अपघात प्रवणस्थळ झाले आहे. महामेट्रोने केलेल्या या बांधकामावर न्यायालयाने चिंता व्यक्त केली. तसेच, वाहतूक पोलिसांच्या कार्यावर देखील खंत व्यक्त केली. वाहतूक विभागाकडून हे स्थळ आत्तापर्यंत धोकादायक म्हणून सुचविण्यात यायला हवे होते, अशी अपेक्षा व्यक्त करीत पोलिस उपायुक्तांना यावर उत्तर दाखल करण्याचे मौखिक आदेश न्यायालयाने दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT