raided
raided  sakal
नागपूर

Nagpur : लकडगंजमध्ये फर्मवर छापा, ५६ लाखांची रोख जप्त

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पैसे घेतल्यावर ते काही दिवसात दामदुप्पट करून देण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेत, ते परत देण्यासाठीही पैसे मागणाऱ्या लकडगंज येथील एका फ्लॅटमध्ये असलेल्या फर्मच्या कार्यालयात छापा टाकून ५६ लाखांची रोख रक्कम जप्त केली आहे. परिमंडळ १ चे उपायुक्त अनुराग जय आणि परिमंडळ३ चे उपायुक्त गोरख भांबरे याच्या विशेष पथकाने ही संयुक्त कारवाई केली.

लकडगंजमध्ये फर्मवर छापा, ५६ लाखांची रोख जप्त

विक्रांत एक्सचेंज नावाच्या फर्ममध्ये २ ते ३ जणांकडून काहीना कॉल करून त्यांना मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवल्यास त्यावर ३ ते ४ टक्के काही दिवसात मिळेल असे सांगण्यात आले. यावेळी एक २० वर्षीय युवकाने त्यात ७ लाख रुपये गुंतविले.

दरम्यान अपेक्षेप्रमाणे व्याज मिळत नसल्याने त्याने पैसे परत मागण्यास सुरुवात केली. मात्र, पैसे परत पाहिजे असल्यास अजून पैसे द्यावे लागतील असे फर्ममध्ये असलेल्या तिघांनी सांगितले. दरम्यान युवकाने आपल्या मित्राला सांगून त्याला अडीच लाख गुंतविण्यास सांगितले. दरम्यान पैसे परत मिळत नसल्याने त्याने प्रतापनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांच्या क्रमांकावरून लोकेशन ट्रेस केले.

त्यातून पथकाने त्यांना सेंट्रल एव्हन्यू येथून ३ ते ४ जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांचे कार्यालय हे लकडगंज येथे असलेल्या एका अपार्टमेंट मधील कार्यालयात छापा टाकला. तिथे सुमारे ५६ लाख रुपये जप्त केले. या प्रकरणात सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

पैसा हवालात वापरत असल्याचा संशय

काही जण दामदुपटीचे आमिष दाखवून ग्राहकांकडून पैसे घेतात. त्यांना व्याज व मूळ रक्कमही देत नाहीत, अशी तक्रार पोलिसांकडे आली होती. या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान जमा केलेला पैसा हा हवालाच्या कामासाठी वापरण्यात येत होता काय याबाबत पोलिस तपास करीत आहेत. विशेष म्हणजे कारवाई बाबत पोलिसांकडून आरोपीच्या नावाबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT