Nana Patole
Nana Patole Esakal
नागपूर

Nagpur : संजय राऊत तुम्ही कॉंग्रेसचे प्रवक्ते नाही, चोमडेगिरी बंद करावी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शरद पवार यांचा राजीनामा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षांतर्गत विषय आहे. दुसऱ्याच्या घरात डोकावणे ही काँग्रेसची संस्कृती नाही, असे सांगून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना चोमडेगिरी बंद करावी असा सणसणीत टोला बुधवारी लगावला.

मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे नामधारी अध्यक्ष आहेत. सर्व निर्णय राहुल गांधी हेच घेतात, या राऊत यांच्या वक्तव्याचा पटोले यांनी चांगलाच समाचार घेतला. ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत. गांधी परिवार म्हणजे त्यागाचे मूर्तिमंत रूप आहे. मल्लिकार्जुन खरगे मोठे नेते आहेत, त्यांचा या पद्धतीने अपमान होत असेल, तर आम्ही तो सहन करणार नाही, असा इशाराही पटोले यांनी दिला.

पहाटेचा शपथविधी सर्व देशाने बिघतला आहे. कॉंग्रेसकडून कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करण्यात आला होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद आपल्याला नको असल्याचे तेव्हाच सोनिया गांधी यांनी सांगितले होते. वेळ आल्यावर याविषयावर सविस्तर बोलेन, असे नाना पटोले म्हणाले.

राष्ट्रवादीलाही टोला

आमच्या पक्षात लोकशाही आहे. आघाडीसाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो नव्हतो. तेच सोनिया गांधी यांच्याकडे आले होते. त्यामुळे कोणाच्या मध्यस्थीने तेव्हा सरकार झाले, हेही सर्वांना ठाऊक आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा कुणाचा होता, पहाटेच सरकार कुणाचे होते हेही सर्वांना माहिती आहे, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे बोट दाखवले.

आघाडीवर परिणाम नाही

महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीवर शरद पवार यांच्या राजीनाम्याचा काहीही परिणाम होणार नाही. त्यांच्या निर्णयासाठी पक्षातील कमिटी तयार झाली आहे, ते निर्णय घेतील. शरद पवारांचा राजकारणातील अनुभव मोठा आहे. त्यांनी राजकारणात सक्रिय राहावे, अशी सगळ्यांचीच इच्छा आहे, असेही पटोले म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT