Nagpur Two aara machine fire Wood Loss fire brigade
Nagpur Two aara machine fire Wood Loss fire brigade sakal
नागपूर

नागपूर : दोन आरा मशीनला आग

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहराच्या बाहेर भंडारा रोडवरील दोन आरा मशीनला लागलेल्या आगीत लाखो रुपयांच्या लाकडांची राखरांगोळी झाली. अग्निशमन विभागाने माहिती मिळताच सहा बंब रवाना केले. दोन तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

भंडारा रोडवर कापसी बिडगाव येथे किशोर पटेल यांच्या मालकीची खेतानी इंटरप्रायजेस व भारत पटेल यांचे हेराधन टिंबर मार्ट आहे. या दोन्ही ठिकाणी आरामशीन आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे विविध जातीची लाकडे येथे होती. आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास या दोन्ही आरा मनशीनला आग लागली.

येथील सुरक्षा रक्षकांना आगीचा धूर व काही वेळातच आगीचे लोळ दिसून आले. त्यांनी तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन विभागाने कळमना, लकडगंज, सुगतनगर, गंजीपेठ, सक्करदरा, कॉटन मार्केट अग्निशमन केंद्रातून सहा आगीचे बंब घटनास्थळी रवाना केले.

लाकडे असल्याने आगीने संपूर्ण लाकडे कवेत घेतली. अग्निशमन जवानांनी तत्काळ पाण्याचा मारा सुरू केला. दोन तास पाण्याचा मारा केल्यानंतर आग आटोक्यात आली. परंतु या आगीत लाखो रुपयांचे लाकडे व विद्युत तारा, आवश्यक साहित्य जळाले. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही, असे अग्निशमन अधिकाऱ्यांनी नमुद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT