Nagpur University exams offline multiple choice questions
Nagpur University exams offline multiple choice questions esakal
नागपूर

नागपूर : विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन बहुपर्यायी प्रश्‍‍नाचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा अखेर ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्वत परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे, ऑफलाइन परीक्षा असताना, विद्यार्थ्यांना त्यांच्याच महाविद्यालयातील होम सेंटरवर परीक्षा द्यावी लागणार आहे. याशिवाय प्रश्‍नपत्रिकेचे स्वरुप बहुपर्यायी राहणार आहे.

विद्यापीठाद्वारे यापूर्वी परीक्षा मंडळाच्या बैठकीत ऑनलाइन परीक्षेबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार विद्यापीठाने तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी कुलगुरूंच्या बैठकीत, ऑफलाइनचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर विद्यापीठाने लवकरात लवकर परीक्षेबाबत निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, याला वीस दिवसांपेक्षा जास्तीचा कालावधी उलटून गेल्यावरही विद्यापीठाकडून कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नव्हता.

दोन दिवसांपूर्वी विद्यापीठात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी बैठक घेतली. त्यामध्ये ८ जून पासून पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि १५ जूनपासून सर्वच पदव्युत्तर अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या परीक्षा, २२ जून पासून सर्वच अभ्यासक्रमातील सम सत्रांच्या परीक्षा घेण्याचे ठरले. मात्र, परीक्षा नेमकी कोणत्या मोडवर परीक्षा घेण्यात येणार आहे, याबाबत कुठलाच निर्णय घेण्यात आला नव्हता.

दरम्यान आज शुक्रवारी सकाळी विद्वत परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे ठरले. याशिवाय परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्‍न असलेली प्रश्‍नपत्रिका विद्यापीठाद्वारे देण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्याच महाविद्यालयातील होम सेंटरवर परीक्षा द्यावी लागणार आहे.

तीन सत्रात होणार परीक्षा

विद्यापीठाद्वारे घेण्यात येणाऱ्या उन्हाळी परीक्षा या एकाच दिवशी तीन सत्रात घेण्यात येणार आहे. यापूर्वी विद्यापीठाद्वारे ऑनलाइन परीक्षा तीन सत्रात घेण्यात येत होती. अंतिम वर्षांसह इतर परीक्षा वेळेत पूर्ण व्हाव्या यासाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतला असल्याचे समजते.

अशी असेल परीक्षा

  • बहुपर्यायी प्रश्‍न (एमसीक्यू)

  • ५० प्रश्‍न, त्यापैकी ४० प्रश्‍न सोडविणे

  • ९० मिनिटाचा वेळ

  • महाविद्यालये होम सेंटर

अशा आहेत तारखा

  • ८ जून - पदवी अभ्यासक्रम अंतिम वर्ष परीक्षा

  • १५ जून - पदव्युत्तर अभ्यासक्रम अंतिम वर्ष परीक्षा

  • २२ जून - सर्व अभ्यासक्रमातील सम सत्राच्या परीक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT