Nagpur
Nagpur Sakal
नागपूर

नागपूर विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी ई-लायब्रेरी तयार करणार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विद्यापीठाचा (University) विद्यार्थी (Students) देशात कुठेही असला तरी त्याला त्याच्या हक्काच्या ग्रंथालयातील पुस्तकांचा संदर्भ घेता यावा. अभ्यासासाठी त्याचा वापर करता यावा यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे ग्रंथालयाची ई-लायब्रेरी (E-library) तयार करण्यावर भर आहे. यासोबतच विद्यापीठातील दुर्मीळ ग्रंथाची जोपासना केली जाईल असा मानस ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालकपदी नियुक्त झालेले डॉ. विजय खंडाळ (Vijay Khandal) यांनी व्यक्त केला.

ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालकपदी डॉ. विजय खंडाळ यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी नवराष्ट्रशी संवाद साधला. डॉ. खडाळ म्हणाले, विद्यापीठातील एका महत्त्वाच्या घटकाची जबाबदारी पार पडताना विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सोयी पुरविण्याकडे कल असणार आहे. ग्रंथालयातील पुस्तके विद्यापीठाप्रमाणेच विद्यार्थ्यांची संपत्ती आहे. प्रत्येक पुस्तक ई-लायब्रेरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचायला हवे. अभ्यासक्रमात असलेली सर्व पुस्तकांची ई-पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती असावी. ग्रंथालयातील सर्व दुर्मीळ पुस्तकांची जोपासना व्हावी. विद्यार्थ्यांना चांगले सुसज्य ग्रंथालय मिळावे. विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके मिळायला हवीत. विशेष म्हणजे ती कोणत्याही वेळी व कुठेही उपलब्ध व्हावी या दिशेने प्रयत्न केले जातील.

विद्यार्थी संघाचे अध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांचे प्रतिनिधीत्व केले आहे, यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणींची जाणीव आहे, ग्रंथालय व पुस्तकासंदर्भात विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडिवणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रंथपाल व संगणिकीकरण तज्ज्ञ म्हणून यशंवतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील ग्रंथालय अत्याधुनिकीकरणाचा फायदा विद्यापीठाला व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT