Nagpur Development Survey
Nagpur Development Survey sakal
नागपूर

नागपूर : झोपडपट्टीत ४३ टक्के घरांमध्ये चुलीवर स्वयंपाक

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : प्रचंड वेगाने काळ बदलतो..तसे प्रश्‍नही बदलत आहेत. परंतु, झोपडपट्टीत आयुष्य जगणाऱ्यांच्या स्थितीत बदल झाला नाही. अजूनही पहाटेचा सूर्य उगवण्यापूर्वी सुरू झालेल्या बाया-माणसांच्या जगण्याचा प्रवास अंधकाराच्या दिशेनेच. झोपडपट्टीत जगताना ४३ टक्के घरांमध्ये चुलीचा वापर स्वयंपाकासाठी होत असल्यामुळे अनारोग्याचा अंधार त्यांच्या शरीरावर आक्रमण करीत आहेत याची पुसटशी माहिती त्यांना नसल्याचे विदारक चित्र पुढे आले आहे.

‘वॉरियर मॉम्स आणि सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ (नागपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरातील खामला वस्ती, डिप्टी सिग्नल, काचीपुरा, आदिवासी नगर, न्यू वैशाली नगर, सुरेंद्रगड, भांडेवाडी, भानखेडा, शिवाजी नगर, जयताळा, इंदिरा नगर आणि बाळाभाऊ पेठ या १२ झोपडपट्ट्यांतील १५०० घरांचा अभ्यास करण्यात आला. हे सर्वेक्षण करताना चूल वापरणाऱ्या ८१ टक्के महिलांना खोकल्याचा तर ६५ टक्के लोकांना डोळे चुरचुरण्याचा त्रास होत आहे.

या सर्वेक्षण अहवालाचे ‘वूमन्स हेल्थ अॅण्ड वेल-बिईंग, की इंडिकेटर ऑफ क्लीन एअर : इनसाईट फ्रॉम अ सर्व्हे ऑन बायोमास बर्निंग इन हाऊसहोल्ड्स ऑफ नागपूर, महाराष्ट्र’चे प्रकाशन महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे हस्ते चिटणीस सेंटरमध्ये गुरुवारी झाले. यावेळी श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. समीर अरबट,लीना बुद्धे, रेखा जोगदंड उपस्थित होते. चुलीवर स्वयंपाक करत असताना होणाऱ्या यातना आणि त्यांच्या व्यथा पद्मश्री छायाचित्रकार सुधारक ओलवे यांनी टिपल्या असून त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले.

लीना बुद्धे यांनी चुलीच्या धुरामुळे झोपडपट्टीतील महिलांचे आरोग्य दररोज धोक्यात येत आहे. ही समस्या हाताळण्यासाठी शासनाने नागपूर शहरातील हवा प्रदूषण कमी करण्याच्या आराखड्यात स्वयंपाकासाठी क्लीन इंधनाच्या वापराला प्राधान्य देण्यासाठी उपाययोजना करावी असे सांगितले. रेखा जोगदंड यांनी चुलीवरच स्वयंपाक महिलांच्या दु:खात भर घालणारा असल्याची खंत व्यक्त केली.

सर्वेक्षणातील ठळक नोंदी

  • चुलीवर स्वयंपाक- ४३ टक्के

  • एलपीजीचा वापर- ५७ टक्के

  • चुलीसाठी लाकडे वापरण्याचे काम महिलांचे-४३ टक्के

  • चूल वापरणाऱ्या महिलांना खोकला- ८१ टक्के

  • एलपीजी वापरणाऱ्या महिलांना खोकल्याचा त्रास-२३ टक्के

  • एलपीजी वापरणाऱ्या व्यक्तींना डोळे चुरचुरण्याचा त्रास-१८ टक्के

  • चूल वापरणाऱ्या व्यक्तींना डोळे चुरचुरण्याचा त्रास-६५ टक्के

चुलीवर स्वयंपाक करताना होणाऱ्या गंभीर परिणामांची माहिती जनतेपर्यंत पोहचावी. क्लीन इंधनाची (प्रदूषण न करणारे) उपलब्धता करून देण्यासाठी सरकारी योजना आहेत. परंतु अंमलबजावणीसाठी सामाजिक-सांस्कृतिक समजुती हाताळणे महत्त्वाचे आहे. तेव्हाच पूर्णपणे एलपीजीमध्ये परिवर्तन होऊ शकेल.

- राधाकृष्णन बी, आयुक्त, नागपूर महानगर पालिका. नागपूर.

चुलीच्या इंधनातील धुरामुळे महिला, मुलांना श्वसनाचे विकार, दमा, हृदयरोग, क्षयरोग आणि फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका आहे. सातत्याने धुराचा सामना करावा लागल्याने महिलांना गरोदरपणात गंभीर परिणामांना सामोरे जाण्याचा धोका आहे. मृत बालक जन्माला येऊ शकते. कमी वजनाचे बालक, अंतर्गभीय वाढ मंद होण्याची भीती आहे.

- डॉ. समीर अरबट, श्वसनरोग तज्ज्ञ, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT