Ravi Rana and Navneet Rana
Ravi Rana and Navneet Rana sakal
नागपूर

नागपूर : राणा दाम्पत्याचे चालिसा पठण राजकीय; राष्ट्रवादीचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : हनुमान चालिस पठनावरून आज नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि राणा दाम्पत्यामध्ये शाब्दिक सामना रंगला. दोन्ही गट एकमेकांसमोर एकाच वेळी येऊ नये याची खबरदारी पोलिसांनी घेतल्याने प्रत्यक्षात खडाजंगी झाली नाही. राष्ट्रवादीने राणा दम्पत्याचे चालिसा पठन राजकीय असल्याचा आरोप केला तर नवनित राणा यांनी मुख्यमंत्र्यांनी शनी संबोधले तसेच महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या रुपाने शनीची साडेसाती लागली असल्याने चालिना पठन केले जात असल्याचे सांगितले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही हनुमान चालिसा पठणावर यावर प्रतिक्रिया व्यक्त करून राजकीय टीकाटिपणी केली. फडणवीस यांनी हनुमान चालिसा पठणावर बंदी घालता येत नाही. महाविकास आघाडी सरकारने यावरचे राजकारण बंद करावे असा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला तर नाना पटोले यांनी राणा दम्पत्याना काय करायचे ते करू द्या आम्हाला यात काही रस नाही असे सांगून अधिक भाष्य करण्याचे टाळले.

हनुमान चालिसाचे राजकारण बंद करा

कुणी हनुमान चालिसा पठण करत असेल तर चांगलेच आहे. कोणाला हनुमान चालिसा पठण करण्यापासून रोखता येत नाही. ज्यांना चालिसा पठण करायचे आहे त्यांना करू द्या, असे सांगून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारने हनुमान चालिसाचे राजकारण बंद करावे असे आवाहन केले. राणा दांपत्याचे समर्थनात लागलेल्या पोस्टर बॅनरवर आज भाजपच्या बड्या नेत्यांचे फोटो दिसतात. या प्रश्नावर ते म्हणाले, सकारात्मक असले तर आमची हरकत नाही. मुख्यमंत्र्यांना राणा यांनी शनी म्हटले. यावर सर्वांनीच सभ्य भाषेचा वापर करावा असा सल्ला फडणवीस यांनी दिला. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एक अक्षरही बोलले तरी तुम्हाला किमान पाच ठिकाणच्या जेलमध्ये जावे लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Labour Day : कामगार दिन! प्रत्येकाला माहिती असायला हवे असे भारतातील 11 कायदे

Satara Lok Sabha : शरद पवारच माझे मुख्य प्रचारक; असं का म्हणाले खासदार उदयनराजे?

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT