नागपूर

नेटकरी लेखकांसाठी 'पेनपेनी', पोस्ट लिहून कमवा पैसे

केतन पळसकर

नागपूर : मोबाईल आणि इंटरनेट क्रांतीबरोबरच माध्यमांचा कायापालट झाला. यात सोशल मीडिया (social media) या नव्या माध्यमाचीसुद्धा भर पडली. कालांतराने सोशल मीडियाच्या आकर्षण आणि कुतूहलापोटी प्रत्येक जण पोस्टच्या माध्यमातून व्यक्त व्हायला लागला. आता याच लिखाणाच्या जोरावर नेटकरी पैसेही कमवू शकणार आहेत. अशा हौशी लेखकांसाठी अनुयात कंपनीने ‘पेनपेनी’ (penpeni ) हे एक नवे माध्यम उपलब्ध करून दिले आहे. (penpeni for writer on social media)

नेटकरी सोशल मीडियावर दररोज अनेक तास घालवतात. यातून एक दमडीही मिळत नाही. त्याउलट, अशा सोशल मीडिया कंपन्या नेटकऱ्यांच्या जिवावर कोट्यवधी रुपये दररोज कमवितात. या परिस्थितीत बदल व्हावा म्हणून पुण्यातील ‘अनुयात’ या कंपनीचे संचालक जीवन घाडगे यांच्या संकल्पनेतून ‘पेनपेनी’ हे व्यासपीठ उदयास आले. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इतकेच हे माध्यम वापरायला सोपे असून लिखाणाला मिळणाऱ्या लाइक्स, कॉमेंट, शेअरद्वारे नेटकरी लेखक चार पैसे कमवू शकतील. उत्पन्नाशिवाय इतर बाबीचा विचार केल्यास या नव्या आयामामुळे समविचारी लेखक आणि वाचक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एका व्यासपीठावर येतील. त्यांचे विचार, लिखाण आणि कल्पनांचे आदान-प्रदान ‘पेनपेनी’मुळे होईल. लिखाणाचे विषय आणि प्रदेशाची मर्यादा नसल्याने जगभरातील लेखक व वाचक आपला प्रभाव या माध्यमातून पाडू शकतील.

पेन (कलम) आणि पेनी (ब्रिटिश चलन) या दोन शब्दापासून ‘पेनपेनी’ हे नाव या माध्यमासाठी आम्ही निवडले. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून यूजर हव्या त्या विषयावर लेखणीतून व्यक्त होऊ शकतो. तसेच, एखाद्या घडामोडीवर आपले मतसुद्धा व्यक्त करू शकतो. गुंतवणूक म्हणून केलेल्या या लेखनावर यूजर नेटकऱ्यांच्या प्रतिसादानुसार मोबदला मिळवू शकेल.

-जीवन घाडगे, संचालक, अनुयात (Anuyat)

सुरुवात कशी कराल?

  • लिखाण सुरु करण्यासाठी www.penpenny.com हे संकेतस्थळ ओपन करा

  • साइनअपवर क्लिक करावे

  • गुगल आयडीद्वारे लॉगइन करून किंवा खालील बॉक्समध्ये नाव, इ-मेल आदी माहिती भरावी

  • आपला पासवर्ड सेट करा आणि आपल्याला हव्या त्या विषयावर लिखाण करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

CSK vs SRH Live IPL 2024 : दोन हेवी वेट संघ भिडणार, विनिंग ट्रॅकवर कोण परतणार?

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

SCROLL FOR NEXT