Rent a Toy startup Toys available on rent Electric toy cars bikes all kinds of toys  sakal
नागपूर

Toys : खिशातून जास्त पैसे न देता; नवीन खेळणी देऊन करा मुलांचा हट्ट पूर्ण

इलेक्ट्रिक टॉय कार, बाईक सर्व प्रकारची खेळणी मिळतात रेंटवर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : खेळणी ही केवळ खेळण्यासारखी नसून मुलांना विविध कौशल्ये पूर्ण क्षमतेनुसार विकसित करण्यात मदत करतात. मात्र, खेळणी महाग असल्याने, विविध प्रकारची खेळणी खरेदी करणे हे सर्वांच्या अवाक्यात नसते.

कारण मुलांना काही दिवसातच नव्या खेळण्याचा कंटाळा येतो, ज्यामुळे पैशांचा व जागेचा अपव्यय होतो. या समस्येवर नरेश साबू यांनी पर्याय शोधला आणि ‘रेंट ए टॉय'' हे स्टार्टअप सुरू केले. पालकांनाही ही सेवा आवडत आहे.

खिशातून जास्त पैसे न देता प्रत्येक वेळी नवीन खेळणी देऊन मुलांचा हट्ट पूर्ण करणे शक्य झाले आहे. विविध पार्ट्यांसाठी लागणाऱ्या साहित्याची विक्री करणारे नरेश साबू यांच्याकडे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या दृष्टीने साहित्य खरेदीठी पालक येत असत.

तेव्हा त्यांना लहान मुलांच्या खेळण्याची मागणी होऊ लागली. तेव्हा त्यांना ‘रेंट ए टॉय'' ही संकल्पना सूचली. जानेवारी २०२३ पासून हे स्टार्टअप सुरू केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून सध्या ६० ते ७० ग्राहक जुळले आहेत.

५०० च्या जवळपास खेळणे सध्या आमच्याकडे असून सहा ते १२ वर्षे वयोगटातील मुलांच्या मागण्या पूर्ण केल्या जात आहेत. दहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून हा व्यवसाय सुरू केला. पाचशे रुपयापासून ते २० हजार रुपयांचे खेळणे भाडेतत्वावर देण्यात येते. ग्राहकांना आपल्याला हवे असलेले खेळणे १५ दिवसांच्या मुदतीवर घरी घेऊन जाता येते. त्यासाठी ५० ते १५०० रुपयाचे शुल्क आकारले जाते.

खेळणीही मिळतात भाडेतत्वावर

नरेश साबू म्हणाले, मध्य भारतात ही सुविधा प्रथमच सुरू झालेली आहे. मुंबई आणि दिल्लीतही अशी सुविधा नाही. महागडी खेळणी मुलांपर्यंत पोहोचवली पाहिजेत, या विचाराने ती आणली आहे. बाजारात इतक्या प्रकारची खेळणी उपलब्ध आहेत की आपल्या मुलांसाठी उपयुक्त खेळणे निवडणे खूप कठीण आहे.

मात्र, येथे आल्यानंतर मुलांच्या मागणीनुसार भाड्याने खेळणी दिली जातात. दर १५-१५ दिवसांनी नवीन खेळण्याने खेळायला मिळते. त्यामुळे मुलांना आनंद मिळतो आणि पालकही त्यांच्या नवीन खेळण्यांचा हट्ट पूर्ण करू शकतात.

ही आहेत खेळणी

किड्स इलेक्ट्रॉनिक बाईक, कार, जीपसह बीएमडब्ल्यू इलेक्ट्रॉनिक कार, व्हेस्पा, हॉव्हरबोर्ड, एअर हॉकी, सी-सॉ, पूल टेबल, रेनबो सुपीरियर ज्युनिअर ट्रॅम्पोलिन, डार्ट्स शॉट, किड्स लॅडर, जंबो पॉपअप टनेल, ३ इन वन स्लाईडचा समावेश आहे. एंड सॉकर, एज्युकेशन टॉय, किड्स सायकल, किड्स स्ट्रॉलर, किक स्कूटर, स्लाइड सुप्रीम, बिग स्विंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Clash: मिरजेत दोन गटात राडा; तणाव नियंत्रणात, स्वतः एसपी उतरले रस्त्यावर

Himachal Pradesh Bus Landslide : हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये भीषण दुर्घटना; बसवर दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू!

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या! वडील महावितरणमध्ये वरिष्ठ अधिकारी; अभ्यासात हुशार, घरची स्थिती चांगली, बहीणही मेडिकललाच, तरी केली उचलले टोकाचे पाऊल

विद्यापीठाच्या युवा महोत्सवात मानपानावरून कुलगुरुंसमवेत वाद; स्टेजवर बोलावून मानमान न दिल्याने अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सत्कार न स्विकारताच परतले

मोठी ब्रेकिंग! सोलापुरातील समर्थ सहकारी बॅंकेच्या व्यवहारावर ‘आरबीआय’चे निर्बंध; काय आहेत निर्बंध, वाचा...

SCROLL FOR NEXT