rutuja wankhede
rutuja wankhede e sakal
नागपूर

नागपूर ते थेट मराठी मालिका, मोठ्या कलावंताना ॠतुजाच्या वेशभुषेचा साज

केतन पळसकर

नागपूर : कलावंतांच्या अभिनयासह प्रेक्षकांवर प्रभाव पाडणाऱ्या अनेक बाबी असतात. यातील एक बाब म्हणजे कलावंतांची वेशभूषा. कथेतील काळ, व्यक्तिरेखेचा स्वभाव नजरेपुढे उभा करण्यास वेशभूषा अत्यंत महत्त्वाची बाब ठरते. त्यानुसार, मालिकेतील काही कलावंतांना नागपूरकर ऋतुजा वानखेडेने (costume designer rutuja wankhede) साकारलेल्या वेशभुषेमुळे साज चढतो आहे.

ऋतुजा शहरातील राष्ट्रभाषा परिवाराच्या नाटक विभागाची सदस्य आहे. नाटकावर असलेल्या प्रेमामुळेच ती आज ग्लॅमरच्या या दुनियेत आपली ओळख निर्माण करू शकली आहे. सहसा ग्लॅमरमुळे आकर्षित होत अभिनयामध्ये आपले नशीब आजमावीत पडद्यावर झळकण्याचा प्रयत्न प्रत्येक कलावंत करताना दिसतो. ऋतुजा मात्र या कलावंतांच्या व्यक्तिरेखेला साजेल असे रुप देण्याचा प्रयत्न वेशभूषा साकारत करीत आहे. यासाठी तीने पुणे केंद्रावरून चेन्नई विद्यापीठाची एम. एससी. फॅशन टेक्नोलॉजी हा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

कॉस्च्युम डिझायनर म्हणून ॠतुजाने तुझ माझं जमतंया, जीव झाला येडा पिसा या मालिकांसाठी आणि जयंती या चित्रपटासाठी काम केले आहे. शिवाय, तीन जाहिराती आणि काही लघुपटाद्वारेसुद्धा तीने आपले कौशल्य दाखविले आहे. आंतरराष्ट्रीय कॉस्च्युम डिझायनर टोरांका (लंडन), बॉलिवूड फॅशन डिझायनर गुलाम ॲंड अली, लीना भुमरा अशा एका पेक्षा एक नावाजलेल्या मान्यवरांकडून तीने या विषयातील धडे घेतले आहे. वेशभुषेशिवाय राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व व्यावसायिक स्तरावरील कला महोत्सवामध्ये तीने आपली चुणूक दाखविली आहे.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान -

देशाचे प्रतिनिधित्व करताना न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट डिझायनर म्हणून, राज्य नाट्य स्पर्धेत मराठी, हिंदी आणि संस्कृत नाटकांसाठी उत्कृष्ट वेशभूषाकार म्हणून, कामगार कल्याण स्पर्धेत उत्कृष्ट दिग्दर्शक असे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण सात पारितोषिकांनी तीला सन्मानित करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT