नागपूर

लॉकडाउन इफेक्ट : पुन्हा घरीच केस कापण्याची वेळ

केतन पळसकर

नागपूर : आपली केशरचना (हेअर स्टाइल) (Hairstyles) इतरांपेक्षा वेगळी दिसावी यासाठी तासंतास सलूनमध्ये वेळ घालवणारे सध्याच्या संचारबंदीच्या (Curfew) काळात घरीच कटिंग करण्यास प्राधान्य देत आहेत. राज्य शासनाने लॉकडाउन (Lockdown) घोषित केल्यामुळे सलून व्यावसायिकांना (Salon professional) दुकाने बंद करण्याची वेळ आली. त्यामुळे नागरिकांवर पुन्हा घरीच केस कापण्याची वेळ आली आहे. तर लसून व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. (Salon business in financial crisis)

ना ऑफिस, ना कॉलेज, नाकुठले समारंभ अशी सध्याची परिस्थिती आहे. हेअर स्टाइल करून दाखविणार तरी कोणाला, असा प्रश्न अनेकांपुढे आहे. विशेष करून तरुणांमध्ये आपल्या आवडत्या सिने कलाकार आणि खेळाडूंप्रमाणे केशरचना करणाची क्रेझ असते. मात्र, सततच्या लॉकडाउनमुळे नागरिकांना आता घरीच घरीच केस कापायची सवय लागली आहे. यासाठी लागणारे विविध साहित्य आणि ट्रीमर ऑनलाइन उपलब्ध असल्याने अनेकांनी त्याची खरेदी केली आहे.

लॉकडाउनचा कालावधी संपण्याची वाट न पाहता मुलांचे केस कापण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेत हातात ट्रीमर घेतले आहे. त्यासाठी यूट्यूब तसेच सोशल मीडियावर केशकर्तनाचे अनेक व्हिडीओ सर्च केले जात आहेत. तर काहींच्या वाढलेल्या केसांमुळे त्यांचे लूक बदलल्याचे दिसून येते. अनेकजण आपला नवीन कट फेसबुक, व्हॉट्सॲपवर डीपी म्हणून ठेवत आहेत. सलून व्यावसायिकांना ग्राहक मिळत नसल्याने दुकानाचे भाडे, इएमआय, कामगारांचे पगार देणे त्यांना अवघड जात आहे.

...तर बेमुदत उपोषण करू

प्रशासनाने वेळोवेळी वाढविलेल्या लॉकडाउनमध्ये आम्हा सलून व्यावसायिकांचा विचार केला नाही. सततच्या लॉकडाउनमुळे आम्ही मोठ्या आर्थिक अडचणीत आलो आहोत. प्रशासनाने लॉकडाउन वाढवण्यापूर्वी आमचा विचार करावा. अन्यथा आम्ही बेमुदत उपोषण करू, असा पवित्रा नाभिक युवा शक्ती महाराष्ट्रने घेतल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमोल तळखंडे, प्रदेश सरचिटणीस प्रविण चौधरी यांनी दिली.

(Salon business in financial crisis)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT