zoo
zoo 
नागपूर

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरचेही "सॅनेटायझेशन'

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अमेरिकेच्या प्राणीसंग्रहालयातील वाघिणीला कोरोना झाल्याचे कळताच केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने वन्यप्राण्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना काढल्यात. त्यानुसार देशातील सर्वच प्राणीसंग्रहालयातील वन्यप्राण्यांवर 24 तास करडी नजर ठेवली जात आहे. तसेच व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांचा मानवाशी अधिक संपर्क येऊ नये अशा सूचना दिलेल्या असताना सेमिनरी हिल येथील बचाव केंद्राचे (ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टर) वन्यप्राण्यांसह पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आज निर्जंतुकीकरण (सॅनिटाईझेशन) करण्यात आले.
सेमिनरी हिल येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये संकटात सापडलेल्या वन्यजीवांवर उपचार केले जातात. यामध्ये वन्यजीवांबरोबर त्यांना सेवा देणाऱ्यांचा कायम वावर असतो. तसेच जंगलात आणलेला वन्यजीव कुठून आणि कुठल्या परिस्थितीत वाचवून आणला आहे याची माहीती नसते.  कोरोनाच्या या संक्रमण काळात वन्यजीवांसोबतच येथील पशुवैद्यकीय अधिकारी, परिचारक, आणि रेस्क्‍यूचे कर्मचारी यांचेही जीव महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टरसह कार्यालय, पिंजरे, रेस्क्‍यू व्हॅन, रुग्णवाहिकांचे सॅनिटाईझेशन करण्यात आले आहे. आठ ते नऊ दिवस यामुळे संसर्ग होण्यापासून बचाव होऊ शकतो.  सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अमेरिकेतील प्राणीसंग्रहालयातील एका वाघिणीला कोरोनाची लागण झाली आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण व महाराष्ट्र प्राणी संग्रहालय मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे हे पाऊल उचलले आहे. जखमी व आजारी वन्यप्राण्यांच्या आरोग्यात सुधारणाच नव्हे तर सुधारणेनंतर त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडणारे हे पहिलेच केंद्र ठरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Latest Marathi News Live Update : गुजरातमध्ये भुकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.4 तीव्रता

SCROLL FOR NEXT