sweet lime
sweet lime e sakal
नागपूर

विदर्भात पिकणार स्पेनची मोसंबी; 'या'साठी आहे प्रसिद्ध

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : स्पेनमधील ‘कटर व्हेलेंसिया‘ या मोसंबीचे (spain sweet limon) वाण विदर्भात पिकू शकते, असे चाचणीतून समोर आले. त्यामुळे या वाणाच्या प्रसाराला मान्यता दिली आहे. पारंपरिक तसेच स्थानिक मोसंबी वाणाच्या तुलनेत या वाणांचे उत्पादन अधिक आहे. चव, रंग, ज्युसचे प्रमाण याबाबतही हे वाण सरस ठरले आहे. राज्यात प्रसाराला मान्यता मिळावी असा प्रस्ताव दिलेले आहे. मात्र, अद्यापही राज्य शासनाच्या कृषी विभागाने त्याला मान्यता दिलेली नाही, अशी माहिती केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी पत्रकार परिषदेत दिली. (spain sweet limon production will in vidarbha)

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या ३७ व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, मोसंबी उत्पादकांना यामुळे एक वेगळा पर्याय उपलब्ध होणार आहे. या वाणाला मान्यतेची प्रतिक्षा केली जात आहे. गेल्या ३६ वर्षात संस्थेने ४० लाखावर रोगविरहीत रोपांचा पुरवठा केला आहे. दरवर्षी देशभरातून सुमारे साडेसात लाख रोपांची मागणी राहते. त्या तुलनेत संस्थेला केवळ तीन लाख रोपांचाच पुरवठा करणे शक्‍य होते. संस्थेने लाखो शेतकऱ्यांना प्रगत संत्रा व्यवस्थापन, रोप निर्मिती याविषयीचे प्रशिक्षणही दिले आहे. लिंबूवर्गीय विविध फळपिकांचे नवे वाणही विकसित करण्यात आले आहेत.

गेल्या ३६ वर्षात देशभरातील उत्पादकांना विविध वाणांसह दर्जेदार व रोगविरहीत रोपांचा पुरवठा केला आहे. यापुढील काळात देखील शेतकऱ्यांप्रती बांधिलकी कायम ठेवत संस्था संत्रा उत्पादकांसाठी जागतीकस्तरावरील तंत्रज्ञान उपलब्धतेकरीता प्रयत्नशील राहील. संस्थेची स्थापना २८ जुलै १९८५ मध्ये झाली. संत्रा उत्पादकांना उत्पादकता वाढ त्यासोबत किडरोगाला कमी बळी पडणारे वाण देण्यावर संस्थेने या काळात भर दिला आहे. विदेशातील १४ वाणांवर संस्था परिसरात संशोधन सुरु आहे. त्यातून उत्पादनक्षम आणि आपल्या भागात तग धरणारे वाण उपलब्ध करून दिले जाईल असेही त्यांनी सांगितले.

आज स्थापना दिन

संस्थेचा आज बुधवारी (ता.२८) ३७ वा वर्धापनदिन आहे. या कार्यक्रमाला शास्त्रज्ञ निवड समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ.वाय.जी.प्रसाद, राष्ट्रीय मृदा सर्व्हेक्षण संस्थेचे संचालक डॉ. बी.एस. व्दिवेदी उपस्थिती राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT