state co operative bank give 13 crore 89 lakh rupees demand draft to tehsildar
state co operative bank give 13 crore 89 lakh rupees demand draft to tehsildar  
नागपूर

अखेर बँकेला सील लावण्याची कारवाई टळली, १३ कोटी ८९ लाखांचा डीडी केला सुपूर्द

नीलेश डोये

नागपूर : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (मर्यादित) १३ कोटी ८९ लाखांचा डीमांड ड्राफ्ट तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्याकडे जमा केला. यामुळे बँकेला सील लावण्याची कारवाई टळली असून कामगारांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. 

भंडारा येथील वैनगंगा सहकारी साखर कारखान्यावर कर्ज असल्याने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित यांना कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. त्यानंतर २०१० मध्ये त्याचा लिलाव केला. त्यावेळी १४ कोटीत विक्री झाली. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी पगार, पीएफ व इतर रक्कम देण्यासाठी भंडाऱ्याच्या औद्यागिक न्यायालयात दाद मागितली. औद्योगिक न्यायालयाने १३ कोटी ८९ लाख ८४ हजार ३३४ रुपये कामगारांचे देण्याचे आदेश बँकेला दिले. या आदेशाच्या विरोधात बँकेने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने औद्योगिक न्यायालयाचा आदेश योग्य ठरविला. त्यामुळे याच्या विरोधात बँकेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.

सर्वोच्च न्यायालयानेही डिसेंबर २०१९ ला कामगारांच्या बाजुने निर्णच दिला. परंतु, बँकेकडून रक्कम कामगारांना मिळाली नाही. बँकेची मालमत्ता नागपूरमध्ये असल्याने भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी नागपूर जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण वर्ग केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाप्रमाणे तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी बँकेची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश काढले.  सोमवारी प्रशासनासकडून सांकेतिक कारवाई करण्यात आली, तर गुरुवारला न्यायालयाच्या आदेशावरून पुन्हा ताबा घेण्याचा कारवाई करण्यात आली. यावेळी तहसीलदार सूर्यकांत पाटील, नायब तहसीलदार सुनील साळवे, मंडळ अधिकारी राजेश देठे, मलिये आदी उपस्थित होते. गुरुवारलाच बँक ऑफ बडोदामधील बँकेचे खाते सील करण्यात आले होते. आज दुपारी १२ च्या सुमारास बँकेचे अधिकारी तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्या कार्यालयात आले. त्यांनी १३ कोटी ८९ लाख ८४ हजार ३३४ रुपयांचा डीडी जमा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT