file
file 
नागपूर

सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने घेतला अघोरी निर्णय

सकाळ वृत्तसेवा

मेंढला (जि.नागपूर) :  सततची नापिकी व यावर्षी झालेला अतिपाऊस, त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, बॅंकेचे पैसे परत कसे करायचे, या विचाराने चिंताग्रस्त झालेल्या मेंढला येथील एका युवा शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली.


बॅंकेच्या कर्जाची परतफेड करणे झाले कठीण
मृत शेतकऱ्याचे नाव अतुल लाडे (मेंढला, ता. नरखेड) असे आहे. अतुल हा घरचा कर्ता पुरुष होता. वडील मरण पावले तेव्हापासून त्याने अडीच एकर जमिनीचा सांभाळ केला होता. डोक्‍यावर असलेला कर्जाचा डोंगर, उसणवारी पैशाची काळजी व यावर्षी पीकसुद्धा चांगले झाले नाही, या विचाराने तो त्रस्त होता. आपण घेतलेले पैसे परत कसे करायचे, या काळजीत त्याची प्रकृती ढासळत गेली. घरी पैसा नसल्यामुळे घरातील सदस्यांचा उदरनिर्वाह कसा करायचा, या विवंचनेत असलेल्या अतुलने शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घरासमोरील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

आई, तू कार्यक्रमाला जा !
गावांमध्ये वाडी दर्गा येथे कार्यक्रम होता. ग्रामस्थ त्या कार्यक्रमामध्ये गेल्याचे पाहून व आपण कोणाला असा प्रकार करताना दिसायला नको, म्हणून त्याने काळजी घेतली. दुपारी बाराला जलालखेडा येथून आल्यावर त्याची आई आणि त्याने सोबत जेवण केले. त्यानेच आईला कार्यक्रमात जा, असे सांगितले. आई घरून कार्यक्रमाला निघून गेली. रात्री आई घरी परत आल्यावर मोबाईल, दुचाकी, त्याचे जोडे या वस्तू घरीच पडून दिसल्यामुळे आईने तो कुठे गेल्याची चौकशी केली. शेती जंगलाला लागून असल्याने जागल करण्यासाठीसुद्धा तो जात होता. काही घराजवळील लोक दुचाकी घेऊन शेतात त्याला शोधण्यासाठी गेले. तिथेही तो आढळला नाही. घरच्या विहिरीमध्ये टॉर्च लावून पाहिले असता, शेजाऱ्यांना विहिरीमध्ये त्याचा मृतदेह आढळला. जलालखेडा पोलिस ठाण्याला ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी विहिरीतून मृतदेह काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. पुढील तपास जलालखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक डेकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार संजय इंगोले व शरद घोरमाडे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT