court hammer. 
नागपूर

तक्रारदाराच्या मवाळ भूमिकेने आरोपीवर दया

केतन पळसकर

नागपूर : महाराष्ट्र सध्या बलात्कार, खून अशा घटनांमुळे हादरला आहे. असे असताना वाशीम जिल्ह्यातील अनसिंगमधून एक अनोखा प्रसंग पुढे आला आहे. खुनाच्या प्रयत्नात नागपूर खंडपीठाने दहा वर्षांची शिक्षा ठोठावलेल्या आरोपीला सर्वोच्च न्यायालयाने दया दाखवत शिक्षा कमी केली. ही शिक्षा कमी व्हावी म्हणून चक्क घटनेत जखमी झालेल्या इसमाने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली.

जखमी झालेले चिंतामण डांगे आणि आरोपी सय्यद अझहर सय्यद अझहर यांच्यात बेकायदेशीर बांधकामावरून २०१६ साली वाद झाला होता. याचा वचपा काढण्यासाठी ११ मे २०१६ रोजी अनसिंगशहरात निघालेल्या संदल मिरवणुकीत चिंतामण डांगे यांच्यावर अझहरने दोन साथीदारांसह मिळून हल्ला केला. जखमी अवस्थेत फिर्यादीचे नातेवाईक गजानन कुटे यांनी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले आणि आरोपीविरोधात अनसिंग पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली.

पोलिसांनी घटनेची चौकशी करून कनिष्ठ न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजारांची शिक्षा ठोठावली. नागपूर खंडपीठानेसुद्धा ४ जानेवारी २०१९ रोजी निकाल देत ही शिक्षा कायम ठेवली. आरोपीने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत फौजदारी अर्ज दाखल केला. या प्रकरणावर न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती अभय ओक यांच्या समक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने दहा वर्षांच्या शिक्षेमध्ये कपात करीत पाच वर्षांच्या सश्रम कारावासामध्ये ती शिक्षा रूपांतरित केली. तसेच दहा हजार रुपये दंड ठोठावला.

डांगे यांनी केली शिक्षा कमी करण्याची विनंती

प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना हल्यामध्ये जखमी झालेले चितांमण डांगे यांच्या पत्नी आणि आरोपीने संयुक्त शपथपत्र दाखल केले. शपथपत्रानुसार, आम्ही एकाच परिसरामध्ये राहत असून कुटुंबातील वाद मिटला आहे. ही घटना एका गैरसमजामुळे अनपेक्षितपणे घडली. आता आम्ही शांततेने परिसरामध्ये राहतो आहे. तर चितांमण डांगे यांनीसुद्धा सकारात्मकतेने उत्तर देत आरोपीचे वय बघता त्याला माफ करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : अजितदादा पंचतत्वात विलीन; पुत्र पार्थ आणि जय यांनी दिला मुखाग्नी

Ajit Pawar Funeral News Updates : अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पूर्ण, अश्रूंनी व जड अंतःकरणाने अखेरचा निरोप

Latest Marathi News Live Update : केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभामध्ये आर्थिक सर्वेक्षण 2025–26 सादर केले

T20 World Cup: संजू सॅमसन OUT, इशान किशन IN! वर्ल्ड कपमध्ये उतरणारी भारताची तगडी Playing XI

त्याच्या लघवीतून रक्त आलं... १२ तासात पालटलं इमरान हाश्मीचं विश्व; मुलाच्या आजाराबद्दल पहिल्यांदाच बोलला अभिनेता

SCROLL FOR NEXT