नागपूर

केबल व्यावसायिकाला गंडा : सायबर गुन्हेगाराने तीन लाखांनी फसवले

अनिल कांबळे

नागपूर : बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून सायबर गुन्हेगाराने (Cyber criminals) केबल व्यावसायिकाच्या बॅंक खात्यातून तीन लाख रुपये (Three lakhs cheated) परस्पर उडवले. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आनंद अरविंद मिश्रा (२९, रा. राजगृहनगर) यांच्या तक्रारीवरून तोतया बॅंक कर्मचारी रविकुमार शर्मा नावाच्या आरोपीवर गुन्हा नोंदविला आहे. (The-cyber-criminal-fraud-three-lakhs-in-Nagpur)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजता दरम्यान आनंद मिश्रा घरी असताना मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. ‘एसबीआय बँकेतून रविकुमार शर्मा बोलत आहे. तुमच्या खात्यातून चुकीने १.७५ लाख रुपये डेबिट झाले आहेत. ते परत मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करा,’ असे फोनवरून सांगितले. आनंदने ऑनलाइन अर्ज करता येत नाही असे सांगितले असता आरोपीने त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठविली.

आनंदने ती लिंक उघडून त्यात आपली व खात्याशी संबंधित सर्व माहिती भरली. काही वेळाने त्यांच्या मोबाईलवर ओटीपी आला. त्यांनी तो ओटीपी आरोपीला सांगताच त्यांच्या खात्यातून तीन लाख रुपये गुल्लू गौरी नामक व्यक्तीच्या खात्यात जमा झाले. फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक व आयटी ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

पैशाचा मोह नडला

खात्यातून खरच १.७५ लाख रुपये डेबीट झाले आहे का? याचा खातरजमा न करता केवळ पैसे मिळणार हा मोह मिश्रा यांना नडला. जर मिश्रा यांनी बॅंकेशी संपर्क साधून विचारणा केली असती किंवा मोबाईलवरून बॅलन्स चेक केले असते तरीही सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात ते अडकले नसते.

लिंकवर क्लिक, पैसे गायब

सायबर गुन्हेगाराने मिश्रा यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली. मिश्रा यांनी लिंकवर क्लिक करताच त्यांच्या खात्यातून तीन लाख रुपये परस्पर उडाले. सायबर गुन्हेगाराने हा नवीन फंडा तयार केला आहे. अशा लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. (The-cyber-criminal-fraud-three-lakhs-in-Nagpur)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

Hajipur Lok Sabha Result: वर्चस्वाच्या लढाईत वडिलांची जागा राखण्याचे चिराग यांच्यासमोर आव्हान

Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर

Shripad Joshi: बारावीपर्यंत मराठी कम्पलसरी करायला टाळाटाळ का? साहित्यिक श्रीपाद जोशींचा सवाल

SCROLL FOR NEXT