नागपूर

शीतलचे आलिशान कारचे स्वप्न भंगले; डॉक्टर दाम्पत्य खंडणी प्रकरण

अनिल कांबळे

नागपूर : फॅशनेबल कपडे आणि हायफाय वातावरणात राहण्याचे स्वप्न बघत आलिशान कार घरात असावी. कुटुंबासह पर्यटनाच्या ठिकाणी पिकनिकला जावे आणि मस्त महागड्या हॉटेलमध्ये स्टे करावा, अशी इच्छा शीतलची होती. खंडणीच्या पैशातून हे सर्व स्वप्न साकार होऊ शकते, हाच अतिआत्मविश्‍वास शीतलच्या अंगलट आला. डॉक्टर दाम्पत्याला मुलांच्या अपहरणाची धमकी देऊन एक कोटींची खंडणी मागणाऱ्या शीतलला न्यायालयाने तीन दिवसांच्या (१९ पर्यंत) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. (The-dream-of-a-luxury-car-was-shattered)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणीबाज शीतल ईटनकर हिने डॉ. तुषार आणि डॉ. राजश्री पांडे यांच्या दोन्ही मुलांचे अपहरण करण्याची धमकी देऊन एक कोटींची खंडणी दोन पानी पत्र पाठवून दिली होती. या पत्रात तिने डॉ. पांडे यांच्या कुटुंबाची आणि आतापर्यंत केलेल्या कमाईची माहिती असल्याचे लिहिले आहे. पोलिसांना कळविल्यास मुलांना ठार मारण्याची धमकीसुद्धा शीतलने दिली होती. त्यामुळे ठाणेदार विजय आकोत यांनी संवेदनशील प्रकरण असल्यामुळे गांभीर्याने हाताळले.

शीतलने डीटीडीसी कुरिअर कंपनीच्या कार्यालयात बनावट नाव आणि बंद असलेला मोबाईल नंबर दिला होता. पैशाने भरलेली बॅग स्वतःच्या घराच्या मागे असलेल्या रिकाम्या भूखंडावर ठेवण्यास सांगितले होते. जेणेकरून लगेच जाऊन बॅग घरी आणता येईल. कुरिअर कार्यालयासमोर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही शीतल इटनकर दिसत आहे.

परंतु, पोलिस कोठडीत तिने फक्त खंडणीसाठी पत्र लिहिण्याची कबुली दिली. त्या व्यतिरिक्त माहिती देण्यास ती पोलिसांना टाळाटाळ करीत आहे. तिची चौकशी केल्यास लगेच उलटी येत असल्याचे नाटक करते. कुख्यात गुन्हेगारासारखी शीतल वागत आहे. परंतु, पोलिसांकडे भक्कम पुरावे असल्यामुळे शीतलकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. शीतलच्या या पापात आणखी कुणी भागीदार आहे का? याचाही तपास पोलिस करीत आहे.

(The-dream-of-a-luxury-car-was-shattered)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : ममता बॅनर्जी यांचा जाहीर सभेत कलाकारांसोबत डान्स

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT